Sindhudurg: मुंबई-गोवा महामार्गावरील हुमरमळा येथे खड्ड्यांनी घेतला बहिणीचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 16:25 IST2025-06-03T16:25:00+5:302025-06-03T16:25:20+5:30

खड्डे बुजविण्याची मागणी

Sister killed in potholes at Humarmala on Mumbai Goa highway | Sindhudurg: मुंबई-गोवा महामार्गावरील हुमरमळा येथे खड्ड्यांनी घेतला बहिणीचा बळी

Sindhudurg: मुंबई-गोवा महामार्गावरील हुमरमळा येथे खड्ड्यांनी घेतला बहिणीचा बळी

ओरोस : मुंबई-गोवा महामार्गावरील हुमरमळा येथील राणे स्टॉपजवळ दुचाकी चालकाचा रस्त्यातील खड्ड्यांमुळे ताबा सुटून झालेल्या अपघातात येथील सेलीना जॉन फर्नांडिस (२८, रानबांबुळी) या युवतीचा मृत्यू झाला तर दुचाकीस्वार जोसेफ अंतोन फर्नांडिस (३३, रा. नेरुर, ता. कुडाळ) हा जखमी झाला आहे.

हा अपघात रविवार, १ जून रोजी रात्रीच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्ग, हुमरमळा राणेवाडी येथे झाला. याबाबतची माहिती जॉन्सन जॉन फर्नांडिस (२६, रा. जैतापकर कॉलनी, गणेशनगर, रानबांबुळी) याने दिली. सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी जोसेफ फर्नांडिस याच्यावर रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे वेगात गाडी चालवीत गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.

या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेल्या तक्रारदार यांची बहीण सेलीना जॉन फर्नांडिस हिला गंभीर दुखापती होऊन उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याच्या तक्रारदाराच्या तक्रारीवरून सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी जोसेफ अंतोन फर्नांडिस याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १ जून रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास जोसेफ अंतोन फर्नांडिस हा आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच ०७ - एपी ८६५८) ही ओरोस ते कुडाळ अशी घेऊन चालला होता. दुचाकीवर त्याच्या मागे सेलीना जॉन फर्नांडिस ही बसली होती. हुमरमळा राणेवाडी येथील मुंबई-गोवा महामार्गावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन दोघेही रस्त्यावर कोसळले. यात सेलीना हिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला तत्काळ  रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. तर दुचाकीस्वार जोसेफ फर्नांडिस हा जखमी झाला आहे.

खड्डे बुजविण्याची मागणी

दरम्यान, स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हा अपघात झाला त्या ठिकाणी महामार्गावर खड्डे आहेत. या खड्ड्यांमध्ये ही गाडी गेल्याने चालकाचा ताबा सुटला आणि दुचाकी रस्त्यावर पडली. हे खड्डे लवकरात लवकर बुजवावेत, अशी मागणी होत आहे.

Web Title: Sister killed in potholes at Humarmala on Mumbai Goa highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.