शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: सारंग कुलकर्णी यांचा तडकाफडकी राजीनामा, एमटीडीसीच्या जल पर्यटन सल्लागारपदी होते कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 11:53 IST

बहुचर्चित पाणबुडी आणि अंडर वॉटर आर्टिफिशियल रीफ हे दोन्ही प्रकल्प पुन्हा एकदा रखडण्याची भीती

संदीप बोडवे मालवण: सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाचे जनक आणि महाराष्ट्राच्या जल पर्यटनाचे शिल्पकार असलेल्या डॉ. सारंग कुलकर्णी यांनी एमटीडीसीच्या जल पर्यटन सल्लागार पदाचा राजीनामा दिल्याने पर्यटन लॉबीत मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे डॉ. कुलकर्णी यांचा मोठा अभ्यास असलेले सिंधुदुर्गातील बहुचर्चित पाणबुडी आणि अंडर वॉटर आर्टिफिशियल रीफ हे दोन्ही प्रकल्प पुन्हा एकदा रखडण्याची भीती निर्माण झाली आहे. तर डॉ सारंग कुलकर्णी यांच्या तडकाफडकी राजीनाम्या मुळे महाराष्ट्राच्या पर्यटन विभागामधील अंतरंग कुरबुरी समोर आली आहे. नव्या सरकारचा मंत्री मंडळ विस्तार आणि खातेवाटप झाल्या नंतर नोकरशाहीच्या फेरबदलात, महाराष्ट्र सरकारने प्रशासकीय कार्यक्षमतेला अनुकूल करण्यासाठी काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांची पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागात सचिव (पर्यटन) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पाटणे यांच्या नियुक्तीला आठवडा झाला नाही तोच डॉ. सारंग कुलकर्णी यांनी राजीनामा दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

एमटीडीसी सोबत १४ वर्षे काम..अंदमान येथे सागरी जीव संशोधक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. सारंग कुलकर्णी याची २००६ साली एमटीडीसी सोबत स्नॉर्कलिंग प्रशिक्षक म्हणून नाळ जुळली होती. महाराष्ट्राचे तत्कालीन पर्यटन सचिव भूषण गगराणी यांनी सिंधुदुर्ग मध्ये काम करण्यास त्यांना आमंत्रित केले होते. स्कूबा पर्यटनाचा फायदा स्थानिकांनाचा झाला पाहिजे म्हणून वेळोवेळी स्थानिकांना प्रशिक्षण कार्यक्रम त्यांनी राबविले.

पर्यटनाच्या अनेक नावीन्यपूर्ण संकल्पना मांडण्यात त्यांनी महाराष्ट्र सरकार मध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. डॉ. कुलकर्णी यांच्या तडकाफडकी राजीनाम्यामुळे कोकणाच्या पर्यटनाचे मोठे नुकसान होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यावर काय निर्णय घेणार आहेत हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtourismपर्यटन