शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गनगरी : सभापती निवड बिनविरोध

By admin | Updated: November 5, 2014 23:31 IST

जिल्हा परिषद : स्नेहलता चोरगे, अंकुश जाधव, संजय बोंबडी, गुरूनाथ पेडणेकरांना संधी

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापतीपदी स्नेहलता चोरगे, समाजकल्याण सभापतीपदी अंकुश जाधव यांची तर विषय समिती सभापतीपदी संजय बोंबडी व गुरुनाथ पेडणेकर यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली.जिल्हा परिषद सभापतीपदांचा अडीच वर्षाचा कार्यकाल १ आॅक्टोबर रोजी समाप्त झाला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्यावतीने २ आॅक्टोबर रोजी या पदांच्या निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करून खास बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, त्यावेळी एकाही पदासाठी सदस्यांकडून नामनिर्देशनपत्र प्राप्त न झाल्याने ही निवडणूक प्रक्रिया रद्द करावी लागली होती. त्यानंतर या सर्व पदांचा कार्यभार जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्याकडेच होता. बुधवारी पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा परिषद सभापतीपदांच्या निवडीसाठी खास बैठकीचे आयोजन केले होते. या पदांमध्ये महिला व बालकल्याण सभापती पदासाठी स्नेहलता चोरगे यांनी नामनिर्देशन भरले होते तर समाजकल्याण सभापतीपदासाठी अंकुश जाधव यांनी नामनिर्देशन भरले होते तर विषय समिती सभापतींच्या दोन जागांसाठी गुरुनाथ पेडणेकर आणि संजय बोंबडी यांनी नामनिर्देशनपत्र भरले होते. या सर्वांचे अर्ज वैध ठरल्याने आणि प्रतिस्पर्धी अन्य कोणी सदस्यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल न केल्याने पिठासन अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी महिला व बालकल्याण सभापतीपदी स्नेहलता चोरगे यांची, समाजकल्याण सभापतीपदी अंकुश जाधव यांची तर विषय समिती सभापतीपदी संजय बोंबडी आणि गुरुनाथ पेडणेकर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.आजच्या सभापती निवडीच्या बैठकीला जिल्हा परिषदेचे सर्व सत्ताधारी सदस्य तसेच विरोधी गटाचेही सर्व सदस्यांनी उपस्थिती दर्शविली होती. प्रशासनाच्यावतीने सर्व नवनिर्वाचित सभापतींना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. (प्रतिनिधी)वैभववाडी, देवगड, सावंतवाडी, दोडामार्गला झुकते माप आजच्या जिल्हा परिषद सभापती निवडीत वैभववाडी, देवगड, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यांना झुकते माप देण्यात आले आहे. स्नेहलता चोरगे (वैभववाडी), गुरुनाथ पेडणेकर (सावंतवाडी), संजय बोंबडी (देवगड) तर अंकुश जाधव (दोडामार्ग) यांची निवड झाली आहे. अंकुश जाधव यांची समाजकल्याण सभापतीपदासाठी पुन्हा निवड झाली आहे. सत्ताधारी जिल्हा परिषद सदस्यांमध्ये अनुसूचित जातीचे एकमेव सदस्य असल्याने त्यांची निवड अपेक्षितच होती. मात्र आजच्या सभापती निवडीमध्ये उत्साह दिसून आलेला नाही. प्रत्येक निवडीत ढोल, फटाके यांची आतषबाजी होते. आजची निवड मात्र अतिशय शांततेत आणि निरुत्साही वातावरणात झाल्याचे दिसून येत होते.