शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

सिंधुदुर्ग : मोर्ले-पारगड रस्ता दोडामार्गच्या विकासाची नांदी, कामाला युद्धपातळीवर सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 11:16 AM

शिवकालीन पारगड किल्ला ते दोडामार्ग यांना जोडणारा मोेर्ले-पारगड रस्ता दोडामार्ग तालुक्याच्या विकासाचा महामेरू ठरणार आहे. तब्बल दहा कोटी रुपये खर्ची घालून या रस्त्याचे काम सुरू असून या रस्त्याच्या बांधणीमुळे घाटमाथ्यावरील प्रदेश आणि गोवा राज्य जवळ येणार आहे. एकंदरीत मोर्ले-पारगड रस्ता दोडामार्ग तालुक्याच्या औद्योगिक आणि कृषीक्रांतीसाठी विकासाची नांदी ठरणार आहे.

ठळक मुद्देमोर्ले-पारगड रस्ता दोडामार्गच्या विकासाची नांदीदहा कोटी रुपये खर्च : कामाला युद्धपातळीवर सुरुवात

वैभव साळकर दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : शिवकालीन पारगड किल्ला ते दोडामार्ग यांना जोडणारा मोेर्ले-पारगड रस्ता दोडामार्ग तालुक्याच्या विकासाचा महामेरू ठरणार आहे. तब्बल दहा कोटी रुपये खर्ची घालून या रस्त्याचे काम सुरू असून या रस्त्याच्या बांधणीमुळे घाटमाथ्यावरील प्रदेश आणि गोवा राज्य जवळ येणार आहे. एकंदरीत मोर्ले-पारगड रस्ता दोडामार्ग तालुक्याच्या औद्योगिक आणि कृषीक्रांतीसाठी विकासाची नांदी ठरणार आहे.महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमेवर दोडामार्ग तालुका वसला आहे. या तिन्ही राज्यांना एकमेकांशी जोडण्याचे काम दोडामार्ग तालुका करतो. मात्र, असे असले तरी वाहतूक व दळणवळणाच्या सोयी सुविधांअभावी केंद्रस्थान असूनदेखील तालुक्याची औद्योगिक अथवा शेतीविषयक परिस्थिती सुधारलेलीे नाही. मात्र, सद्यस्थितीत तालुक्याची औद्योगिक परिस्थिती सुधारण्याची चिन्हे मोर्ले-पारगड या महत्त्वाकांक्षी रस्त्यावरून दिसू लागली आहेत.

सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यातून हा रस्ता काढला जात आहे.पर्यटनस्थळांच्या विकासाला मिळणार गतीमोर्ले-पारगड या महत्त्वाकांक्षी रस्त्यामुळे चंदगड तालुक्याबरोबरच दोडामार्ग तालुक्यातील पर्यटनस्थळांच्या विकासालाही गती मिळणार आहे. पारगड येथील छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्याला भेट देण्यासाठी येणारा पर्यटक आपसूकच दोडामार्ग तालुक्यात येणार असून त्यामुळे येथील तेरवण-मेढेमधील नागनाथ मंदिर, तिलारी धरण, मांगेलीचे वर्षा पर्यटन, कसईनाथ डोंगर आदी पर्यटनस्थळांचा विकास साधण्यास मदत होणार आहे.औद्योगिक, कृषीक्षेत्राच्या प्रगतीची नांदीमोर्ले-पारगड रस्त्यामुळे गोवा आणि पश्चिम महाराष्ट्र जवळ येणार आहेत. याशिवाय सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने हा मार्ग सोयीचा ठरणार आहे. त्यामुळे औद्योगिकरणाबरोबरच कृषीक्षेत्रातून उत्पादित होणारा माल गोव्यात आणण्यासाठी या मार्गाचा निश्चितच वापर होईल. परिणामी त्याचा फायदा दोडामार्ग तालुक्याला होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कृषी व औद्योगिकक्षेत्रातील तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी त्याचा फायदा होईल. त्यामुळे मोर्ले-पारगड रस्ता औद्योगिक व कृषीक्रांतीची नांदी ठरेल.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकsindhudurgसिंधुदुर्ग