शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

सिंधुदुर्ग : जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे पुणे येथे कोकण महोत्सव, १९ एप्रिलपासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 5:04 PM

जनकल्याण प्रतिष्ठानच्यावतीने कोकण लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कोकण महोत्सवाचे आयोजन पुणे येथे करण्यात आले आहे. हा महोत्सव १९ ते २२ एप्रिल या कालावधीत भोसरी येथील अंकुशराव नाट्यगृहात होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय पाताडे यांनी दिली. याचदरम्यान कोकण वधू-वर मेळावाही घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजनकल्याण प्रतिष्ठानतर्फे पुणे येथे कोकण महोत्सव, १९ एप्रिलपासून प्रारंभ भोसरी येथील अंकुशराव नाट्यगृहात आयोजन

तळेरे : जनकल्याण प्रतिष्ठानच्यावतीने कोकण लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कोकण महोत्सवाचे आयोजन पुणे येथे करण्यात आले आहे. हा महोत्सव १९ ते २२ एप्रिल या कालावधीत भोसरी येथील अंकुशराव नाट्यगृहात होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय पाताडे यांनी दिली. याचदरम्यान कोकण वधू-वर मेळावाही घेण्यात येणार आहे.या महोत्सवाचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, कोकण महासंघाचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम उपस्थित राहणार आहेत. महोत्सवाची सुरुवात १९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता शोभायात्रेने होणार आहे.

या शोभायात्रेत कोकणी कलासंस्कृतीचे दर्शन घडणार आहे. ही शोभायात्रा भोसरी येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन अंकुशराव लांडगे नाट्यगृहात या शोभायात्रेचा समारोप होणार आहे. त्यानंतर सावरेश्वर दशावतार नाट्यमंडळ प्रस्तुत दशावतार कालिया मर्दनचा या कार्यक्रमाचा लाभ घेता येणार आहे.

दशावतार, शक्तीतुरा, संगीत भजनाचा डबलबारी सामना, मालवणी एकांकिका अशा विविध कार्यक्रमांनी महोत्सव रंगणार आहे.

यावेळी सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर यांना कोकणभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. स्वयंवर वधू-वर सूचक वेबसाईटचे उद्घाटन नारायण राणे व भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार विलास लांडे आदी उपस्थित राहणार आहेत. समारोप रविवार २२ एप्रिलला दुपारी ३ वाजता वधू-वर मेळाव्याने होणार आहे. यावेळी आमदार भास्कर जाधव, उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेवक सचिन चिखले, विरोधी पक्षनेते योगेश बहल उपस्थित राहणार आहे.कोकणी संस्कृतीसाठी विशेष आवाहनकोकणातील विविध लोकसंस्कृती, लोककला, खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडविणारे स्टॉल उभारायचे असतील तर अशा व्यक्ती अथवा संस्थांनी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय पाताडे यांनी केले आहे. अशा सर्वांना स्टॉल व राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच रविवारी पावणे इले रे मालवणी एकांकिका सादर होणार आहे. 

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग