सिंधुदुर्गला परदेशी पाहुण्यांची पसंती, अमूल ससाणा चीन मधून तिलारी परिसरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 18:23 IST2026-01-03T18:22:37+5:302026-01-03T18:23:40+5:30
या ठिकाणी येतात पक्षी

सिंधुदुर्गला परदेशी पाहुण्यांची पसंती, अमूल ससाणा चीन मधून तिलारी परिसरात
अनंत जाधव
सावंतवाडी : अमूर ससाणा सारखे पक्षी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात थंडीच्या दिवसांत हजारो किलोमीटरचे उड्डाण घेत परदेशातून येत असतात. यंदा उशिरा थंडी पडल्याने या पक्ष्यांचे आगमन लांबले आहे. सध्या दरवर्षी येणाऱ्या पक्ष्यांच्या तुलनेत तुरळक पक्षी आले असून, पक्षीमित्र परदेशी पाहुण्यांच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात दरवर्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून विदेशी पक्षी येतात. अनेक पक्षीमित्र, शालेय विद्यार्थी व पर्यावरणप्रेमी या पक्ष्यांचा अभ्यास करतात.
स्थलांतरित हे पक्षी प्रजननासाठी आणि अन्नाच्या शोधात भारतात येतात. स्थानिक पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीने हे पक्षी महत्त्वाचे असून, त्यांचे संवर्धन गरजेचे आहे.अमूर ससाणा तर चीन मधील अमूर नदीच्या खोऱ्यातील असून तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काहि भागात आढळून येतो हा अलिकडेच तिलारी परिसरात आढळून आला असून काळा बाज आणि लाल बाज असे हे दोन पक्षी असून दोघेही शिकारी पक्षी म्हणून ओळखले जातात.
या ठिकाणी येतात पक्षी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी परिसरात तसेच विविध समुद्रकिनाऱ्यावर तसेच निर्जन स्थळी हे पक्षी आढळून येतात यात वेंगुर्ला, मालवण, देवगड, मोजेमाड, कर्ली आणि मिठबाव यांसारख्या खाड्या येथे सीगल आणि इतर जलपक्षी येतात तसेच पाट तलाव नेरूर तलाव आणि कळसुली तलाव हे स्थलांतरित पक्षांसाठी महत्त्वाची ठिकाणे आहेत.
कुठून-कुठून येतात ?
अनेक पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून जिल्ह्यात दाखल होतात. काही पक्षी ऑस्ट्रेलिया चीन तसेच आशिया खंडातील काहि देशातून मोठ्याप्रमाणात पक्षी येत असतात
...यामुळे भारतात येतात!
अनेक देशांमध्ये हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होते. त्यामुळे जमिनीवर सर्वत्र बर्फ साचतो आणि पक्ष्यांना अन्न मिळणे कठीण होते. तसेच तापमानात प्रचंड घट झाल्याने नद्यांवर बर्फाची पातळी तयार होते, पाणीही गोठते. त्यामुळे पक्षी भारतात येतात.
पक्षीनिरीक्षण येथे करतात
जिल्ह्यातील विविध तलावांवर दरवर्षी परदेसी पक्ष्यांचे आगमन होते. त्यामुळे पक्षी निरिक्षण करणारे पक्षीमित्र हे सावंतवाडी शहरातील नरेंद्र डोंगर तसेच तिलारी परिसरात वेगवेगळ्या समुद्रकिनाऱ्यावर जाऊन पक्षीनिरीक्षण करत असतात
सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणारे पक्षी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अमूल ससाणा म्हणजे लाल बाज तसेच काळा बाज याच बरोबर समुद्रकिनाऱ्यावर सीगल पक्षी त्याशिवायकॉमन बझर्ड युरेशियन हॉबी साइबेरियन स्टोनचॅट लेसर कुकू ( ब्लिथ्स स्विफ्ट यांसारखे अनेक पक्षी नोंदींमध्ये आतापर्यंत आढळून आले आहेत
जिल्ह्यात दरवर्षी हिवाळ्यात हजारो किलोमीटरचा प्रवास करून विदेशी पक्षी येतात. यावर्षी जिल्ह्यात विदेशी पक्षी कमी प्रमाणात आले आहेत अजून काहि येतील फेब्रुवारीपर्यंत मोठ्याप्रमाणात हे पक्षी येत असतात - डॉ. श्रीकृष्ण मगदूम, पक्षीनिरीक्षक