शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

सिंधुदुर्ग : महामार्ग चौपदरिकरणाअंतर्गत प्रकल्पग्रस्तांचे समाधान न करता काम सुरु करण्यास तीव्र विरोध : नीतेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 1:49 PM

राष्ट्रीय महामार्ग क्र.66 च्या चौपदरिकरणा अंतर्गत कणकवली शहरातील जमीन तसेच मालमत्ता जाणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचे पूर्णतः समाधान होईपर्यन्त काम सूरु करु नये. जबरदस्तीने काम सुरु करण्यास तीव्र विरोध आहे. असे केल्यास जनतेचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा एका निवेदनाद्वारे आमदार नीतेश राणे यांनी जिल्हाधिकाऱ्याना दिला आहे.

ठळक मुद्देमहामार्ग चौपदरीकरणाचा विषय, नीतेश राणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारापूर्तता झालेली नसताना महामार्गाच्या कामास सुरुवात करणे अन्यायकारक काम सुरु केल्यास जनतेचा उद्रेक होऊ शकतो, निवेदनाची प्रत कणकवली प्रांताधिकाऱ्यानाही देण्यात आली

कणकवली : राष्ट्रीय महामार्ग क्र.66 च्या चौपदरिकरणा अंतर्गत कणकवली शहरातील जमीन तसेच मालमत्ता जाणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचे पूर्णतः समाधान होईपर्यन्त काम सूरु करु नये. जबरदस्तीने महामार्गाचे काम सुरु करण्यास आपला तीव्र विरोध आहे. असे केल्यास जनतेचा उद्रेक होऊ शकतो. त्यातून निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नास प्रशासनच जबाबदार राहील. असा इशारा एका निवेदनाद्वारे आमदार नीतेश राणे यांनी जिल्हाधिकाऱ्याना दिला आहे.या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग क्र.66 च्या चौपदरिकरणा अंतर्गत कणकवली शहरातील उड्डाणपूल व रस्त्याचे काम संबधित यंत्रणे मार्फत लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे समजते.

कणकवली शहरातील चौपदरिकरणासाठीच्या जमीन संपादनाचा विषय अद्याप सुटलेला नाही. याबाबत येथील जमीनधारकानी अनेक तक्रारी यापूर्वी आपल्या कार्यालयाकडे सादर केलेल्या आहेत.

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना मी स्वतः भेटून सविस्तर लेखी निवेदन दिलेले आहे. तरी पण अजूनही जमीनधारकांच्या तक्रारीची समाधानकारक पूर्तता झालेली नाही. असे असताना महामार्गाच्या कामास सुरुवात करणे अन्यायकारक ठरणार आहे.याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून जमीनधारकांचे पूर्णपणे समाधान होत नाही तोपर्यन्त काम सुरु करण्यास माझा विरोध राहील. तसेच जमीनधारकांचे समाधान न करता काम सुरु केल्यास जनतेचा उद्रेक होऊ शकतो.

यामुळे निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नास प्रशासनच जबाबदार राहील. त्यामुळे या सर्व स्थितीची दखल घेवून त्वरीत कार्यवाही करावी. असेही या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, या निवेदनाची प्रत कणकवली प्रांताधिकाऱ्यानाही देण्यात आली आहे.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्गhighwayमहामार्ग