शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 5:30 AM

दुडू बसंतगढमध्ये शेकडो जवान सलग ८ व्या दिवशीही गाव सुरक्षा समितीच्या सदस्याची हत्या करणाऱ्या चार पाकिस्तानी दहशतवाद्यांचा माग काढत आहेत.

- सुरेश एस. डुग्गरलोकमत न्यूज नेटवर्कजम्मू : लष्कराने पुंछ जिल्ह्यातील शाहिस्तार येथे आयएएफ वाहन हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी करून माहिती देणाऱ्यास २० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. लष्कर, पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त मोहिमेत शेकडो जवानांनी हल्ल्याच्या ठिकाणाला लागून २० किमीचा परिसर घेरला आहे. 

दुडू बसंतगढमध्ये शेकडो जवान सलग ८ व्या दिवशीही गाव सुरक्षा समितीच्या सदस्याची हत्या करणाऱ्या चार पाकिस्तानी दहशतवाद्यांचा माग काढत आहेत. हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या माध्यमातूनही जंगलावर लक्ष ठेवण्यात येत आहे. श्वानपथकांचाही या कारवाईत सहभाग आहे. सुरक्षा यंत्रणांनी १० हून अधिक जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक आनंद जैन, डीआयजी तेजेंदर सिंग, लष्कर आणि गुप्तचर विभागाचे अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

या हल्ल्यात तीन ते चार दहशतवादी सहभागी असावेत, असा सुरक्षा दलांना संशय आहे. 

पाकचे माजी सैनिकच येत आहेत दहशतवादी बनूनएलओसीला लागून असलेले राजौरी आणि पूंछ हे जुळे जिल्हे सध्या लष्कर आणि इतर सुरक्षा दलांसाठी डोकेदुखी ठरले आहेत. परिस्थिती अशी आहे की, पाकिस्तानने आपल्या माजी सैनिकांना दहशतवादी बनवून या जिल्ह्यांमध्ये पाठवणे सुरू केले आहे. या वर्षीही ही घुसखोरी कायम आहे. २०२३ मध्ये राजौरी या सीमावर्ती जिल्ह्यात डझनभर चकमकी झाल्या आणि शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. गतवर्षी जिल्ह्यासाठी वर्षाची सुरुवात ढांगरी दहशतवादी हल्ल्याने झाली, त्यातील मारेकरी अद्यापही सापडलेले नाहीत. हा ट्रेंड २०२४ मध्येही कायम आहे.

स्टीलच्या गोळ्यांनी वाढविली चिंताnहल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांकडून स्टीलच्या गोळ्यांचा वापर भारतीय लष्करासाठी चिंतेचा विषय बनला आहे. सध्या आपल्या सैनिकांना सतत मागणी करूनही लेव्हल चार बुलेट प्रुफ जॅकेटही देण्यात आलेले नाही. nचिलखती वाहनांवर हल्ला करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या गोळ्यांमुळे सैनिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. दहशतवाद्यांकडील स्टीलच्या गोळ्या जवानांचे बुलेट प्रूफ जॅकेट, बुलेट प्रूफ टोपी आणि बेल्ट भेदत आहेत. 

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी