राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकर सुरु होण्याकरिता बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 05:22 PM2017-10-30T17:22:38+5:302017-10-30T17:23:26+5:30

Meeting to start the work of National Highway | राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकर सुरु होण्याकरिता बैठक

राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकर सुरु होण्याकरिता बैठक

Next
ठळक मुद्देपोहरादेवीच्या विकासात भर पडणार

रिसोड : यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदार संघामध्ये राष्ट्रीय महामार्ग  विभागांतर्गत यवतमाळ व वाशिम या दोन्ही जिल्ह्यामधून जाणारे दिग्रस - दारव्हा -कारंजा व आर्णी - दिग्रस -पोहरादेवी, मानोरा, मंगरुळपीर अकोला ही दोन महामार्ग होणार आहेत.त्यापैकी ७४.३५ कि़मी. लांबी असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.एन.एम.३६१ सी  दिग्रस, दारव्हा, कारंजा या रस्त्याची मंजुरात होवुन या कामाच्या निविदा मंजुर झाल्या आहेत. या कामाला लवकरात लवकर सुरुवात व्हावी याकरिता महामार्ग विभागाच्या यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील अधिकाºयांसोबत खा.भावना गवळी यांनी बैठक घेतली. 

यावेळी या कामाची लवकरच प्रत्यक्षात मोजणी होणार आहे. महामार्गाकरिता लागणाºया जमीनीचे भुसंपादन प्रक्रियेला सुरुवात करण्याबाबत जिल्हाधिकारी यवतमाळ व वाशिम यांच्यासोबत बैठक महामार्गाकरिता असणारी आवश्यक जमीनीचे भुसंपादन करण्याविषयी चर्चा करण्यात आली.

यवतमाळ, वाशिम व अकोला या तीन जिल्हयामधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग एन.एच.१६१ ए आर्णी -दिग्रस - पोहरादेवी -मानोरा- मंगरुळपीर-अकोला हा असुन यापुर्वी सदरचा महामार्ग मानोरा ते अकोला अशा प्रकारे प्रस्तावित करण्यात आलेला होता. या महामार्गाचे सर्र्वेक्षण सुरु असतांना बंजारा समाजाची काशी म्हणुन देशभरात प्रसिध्द असलेल्या व संपूर्ण देशामधून  पोहरादेवी येथे होणाºया विविध वार्षीक धार्मिक  उत्सवामध्ये भक्तांना सोईचे व्हावे याकरिता पोहरादेवी येथुन हा महामार्ग जावा अशी विनंती गवळी यांनी यवततमाळ भेटीत केंद्रीय  परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना केली असता यवतमाळ येथे संपन्न झालेल्या सभेमध्ये हा महामार्ग आर्णिपासून दिग्रस, पोहरादेवी ,मानोरा मार्गे अकोला असे जाहीर केला. सदरचा  महामार्ग परिवहन मंत्रालयाकडे  अंतीम मंजुराती करिता सादर असुन या महामार्गाला लवकरात लवकर मंजुरात मिळावी याकरिता खा.भावना गवळी यांचा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचेकडे  पाठपुरावा  सुरु असुन लवकर या  कामास मंजुरात प्रदान होवुन कामास सुरुवात होण्याकरिता प्रयत्न सुरु असल्याचे गवळी यांनी सांगितले.

Web Title: Meeting to start the work of National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.