राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण रखडलेलेच

By admin | Published: May 25, 2017 12:27 PM2017-05-25T12:27:17+5:302017-05-25T12:27:17+5:30

तिस:या रेल्वे मार्गास प्रारंभ

Fourteen national highways have been closed | राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण रखडलेलेच

राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण रखडलेलेच

Next

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.25- केंद्रातील भाजपा आघाडी सरकारला 26 मे रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. तीन वर्षाच्या कार्य काळात महामार्गाच्या चौपदरीकरणासह जिल्ह्यातील अनेक रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण होतील अशी नागरिकांना अपेक्षा होती. मात्र ना चौपदरीकरण झाले ना रखडलेले प्रकल्प मार्गी लागले. जळगाव शहरातील उड्डाणपुलांचाही प्रश्न अद्याप कायम आहे. 
बलून बंधारे कधी होणार?
केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांनी जळगाव जिल्ह्यात येऊन 2016 मध्ये हवाई पाहणी केली. त्यांनी गिरणा नदीवर सात ठिकाणी बलून बंधारे बांधले जातील असे आश्वासन दिले. गिरणा खोरे हे नेहमी उपेक्षित राहीले आहे. गिरणा नदीचे पाणी अडविण्यासाठी फारसे प्रय} झालेच नाहीत जि.प. निवडणुकांच्या प्रचाराच्या वेळेस मुख्यमंत्र्यांनी सात बलून बंधा:यांचे काम एप्रिल 2017 मध्ये सुरू करू, असे म्हटले होते. पण एक वीटही अजून या बंधा:यांसाठी लावलेली नाही. 
जिल्ह्यातील  शिवाजीनगर, पिंप्राळा या प्रमुख उड्डाणपुलांचा प्रश्न वर्षानुवर्षे कायम आहे. याचे कारण म्हणजे त्यांना निधी उपलब्ध करून दिला जात नाही. पंतप्रधान ग्राम सडक योजना जवळपास गुंडाळल्याची परिस्थिती आहे. ग्रामीण रस्त्यांना थेट केंद्राकडून निधी अशी ही कल्पना होती. परंतु पंतप्रधान रस्ते विकास योजनेला निधीच नाही. चोपडा, यावल, अमळनेर तालुक्यातील रस्ते अपूर्ण आहेत. खुद्द आमदारांनी याबाबतच्या तक्रारी खरीपपूर्व आढावा बैठकीत अलीकडेच केल्या होत्या. चिखली ते फागणे यादरम्यानच्या महामार्गाचे चौपदरीकण होणार म्हणून दोन वर्षापासून विविध निर्णय जाहीर झाले. पण काम सुरु झालेले नाही. आता येत्या जुलै महिन्यात ही प्रक्रिया होईल, असे प्रशासनाने म्हटले आहे. शिवाजीनगर उड्डाणपूल केव्हा?
जळगाव शहरातील शिवाजी नगर उड्डाणपुलाचे आयुष्य संपले आहे. हा उड्डाणपूल उभारण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. आतार्पयत का उभारला नाही? असा प्रश्न विरोधकांनी अनेकदा केला. हा पूल आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाला आहे.  हजारो वाहनधारक, ग्रामस्थांना व निम्म्या जळगावकरांना या पुलावरून अवजड वाहतूक होत नसल्याने हकनाक त्रास सहन करावा लागतो. खासदारांनी कधी या पुलाबाबतचा मुद्दा जाहीरपणे मांडलेला दिसून येत नाही. 
टेक्सटाईल क्लस्टरची फक्त घोषणा
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये नरेंद्र मोदी यांनी खान्देशच्या कापसाचा मुद्दा मांडला होता. आता कापूस गुजरातेत न्यावा लागणार नाही, जळगावातच टेक्सटाईल उद्योग उभारू, असे मोदींनी जळगावात लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या जाहीर सभेत म्हटले होते. नंतर स्वत: खासदार ए.टी.पाटील यांनी 2014 मध्ये जिल्ह्यात बुलडाणाच्या धर्तीवर लहान टेक्सटाईल क्लस्टर आणण्याचा प्रयत्न असल्याचे पत्रपरिषदेत सांगितले होते. परंतु हे क्लस्टरही सुरू झाले नाही. अजूनही गुजरातमध्येच जिल्ह्याचा कापूस जातो. 
जलपुनर्भरण योजना केंद्रीय प्रकल्पात समाविष्ट
महाकाय जलपुनर्भरण योजना ही केंद्रीय प्रकल्पास समाविष्ट झालेली आहे. 2016 मध्ये केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती यांनी या योजनेची पाहणी करून हा एकमेव महाकाय पुनर्भरण प्रकल्प असून, ही महत्त्वाकांक्षी योजना मार्गी लावण्यासाठी निधी कमी पडणार नाही, असे जिल्हा नियोजन भवनातील आढावा बैठकीत म्हटले होते. पण या प्रकल्पासंबंधीच्या कामाच्या हालचाली दिसून येत नाहीत. 

Web Title: Fourteen national highways have been closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.