SSC Result 2025: कोकणच अव्वल; राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा झेंडा कायम, मात्र गतवर्षीच्या तुलनेत निकालात घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 13:15 IST2025-05-14T13:14:35+5:302025-05-14T13:15:03+5:30

४८६ शाळा १०० नंबरी

Sindhudurg district retains its lead in the state in the 10th results, but the results have declined compared to last year | SSC Result 2025: कोकणच अव्वल; राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा झेंडा कायम, मात्र गतवर्षीच्या तुलनेत निकालात घट

SSC Result 2025: कोकणच अव्वल; राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा झेंडा कायम, मात्र गतवर्षीच्या तुलनेत निकालात घट

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत पुन्हा एकदा कोकण विभागीय मंडळाने राज्यात अव्वल स्थान पटकाविले आहे. मंडळाचा निकाल ९८.८२ टक्के इतका लागला असून कोकण विभागात सिंधुदुर्ग जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळवत आपला झेंडा कायम राखला आहे. मंडळात ९ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत.

कोकण विभागीय मंडळातून २६ हजार ८६१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २६ हजार ५४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ९८.८२ टक्के आहे. गतवर्षी ९९.०१ टक्के निकाल लागला होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ०.१९ टक्क्यांनी घट झाली आहे. मंडळात एकूण १३,६६६ मुले उत्तीर्ण झाली असून उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.५२ टक्के आहे. १२,८८० मुली उत्तीर्ण झाल्या असून, मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.१५ टक्के आहे. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ०.६३ टक्क्यांनी अधिक आहे.

रत्नागिरीचा निकाल ९८.५८ टक्के तर सिंधुदुर्गचा ९९.३२ टक्के

रत्नागिरी जिल्ह्यातून १८ हजार ११ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १७ हजार ७५६ विद्यार्थी (९८.५८ टक्के) उत्तीर्ण झाले असून, गतवर्षीच्या तुलनेत ०.२३ टक्क्यांनी घट झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ८८५० विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ८७९० विद्यार्थी (९९.३२ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत सिंधुदुर्गच्या निकालात ०.३ टक्क्यांची घट झाली आहे.

४८६ शाळा १०० नंबरी

कोकण मंडळात दहावीच्या परीक्षेत यावर्षी काॅपीचा एकही प्रकार आढळला नव्हता. दोन्ही जिल्ह्यांतील मिळून ९ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळविले आहेत. ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ९,४६१ आहे. ६० टक्केपेक्षा जास्त गुण मिळविलेले विद्यार्थी १० हजार ३४७ असून, ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेले ५७१५ विद्यार्थी आहेत. ३५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १,०२३ इतकी आहे. मंडळातील ४८६ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. एकमेव शाळेचा निकाल शून्य टक्के लागला आहे.

मंडळाचा सलग १४ वर्षांचा दहावीचा निकाल

२०१२ - ९३.९४
२०१३ - ९३.७९
२०१४ - ९५.५७
२०१५ - ९६.५४
२०१६- ९६.५६
२०१७ - ९६.१८
२०१८ - ९६.००
२०१९- ८८.३८
२०२० - ९८.७७
२०२१- १००
२०२२- ९९.२७
२०२३- ९८.११
२०२४ - ९९.०१
२०२५ - ९८.८२

Web Title: Sindhudurg district retains its lead in the state in the 10th results, but the results have declined compared to last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.