शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
5
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
6
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
7
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
8
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
9
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
10
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
11
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
12
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
13
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
14
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
15
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
16
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
17
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे शौर्य अभिमानास्पद : दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:44 PM

जीवाची बाजी लावून पुरग्रस्तांना मदत करणारे पोलीस आणि गुन्हेगारांचा शोध लावणा-या सिंधुदुर्ग पोलीसांचे शौर्य अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात आज पूर परिस्थितीवेळी विशेष सेवा बजावणाऱ्या पोलीसांना गौरविण्यात आले. तसेच गुन्ह्यातील हस्तगत मुद्देमाल संबंधित नागरिकांना सुपूर्द करण्याचा कार्यक्रम पार पडला त्यावेळी पालकमंत्री श्री. केसरकर बोलत होते.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे शौर्य अभिमानास्पद : दीपक केसरकर पूर परिस्थितीवेळी विशेष सेवा बजावणाऱ्या पोलीसांचा गौरव

सिंधुदुर्ग : जीवाची बाजी लावून पुरग्रस्तांना मदत करणारे पोलीस आणि गुन्हेगारांचा शोध लावणा-या सिंधुदुर्ग पोलीसांचे शौर्य अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात पूर परिस्थितीवेळी विशेष सेवा बजावणाऱ्या पोलीसांना गौरविण्यात आले. तसेच गुन्ह्यातील हस्तगत मुद्देमाल संबंधित नागरिकांना सुपूर्द करण्याचा कार्यक्रम पार पडला, त्यावेळी पालकमंत्री केसरकर बोलत होते.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पोलीस कार्यक्षम राहण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये वसतिगृहाच्या धर्तीवर राहण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार असल्याचे सांगून पालकमंत्री केसरकर पुढे म्हणाले की, अतिवृष्टीच्या काळात पोलीसांनी जीवाची बाजी लावत अनेक लोकांना पुरातून बाहेर काढत जीवदान दिले. गुन्हे तपासातही चांगले काम करत जिल्ह्याला राज्यात दुस-या क्रमांकाचे स्थान मिळवून दिले.सीसीटीव्ही यंत्रणा बसवून आधुनिकीकरण स्वीकारणारा जिल्हा ठरला आहे. जिल्हा पोलीसांची ही कामगिरी अभिमानास्पद अशीच आहे. त्यांना लवकरच चांगल्या सुविधा पुरविण्यात आम्ही कटीबध्द आहोत. आपत्कालीन परीस्थितीचा सामना करण्यासाठी बोटी दिल्या जाणार आहेत. पोलीस दुरक्षेत्र ठिकठिकाणी उभारले जाणार आहे. पोलीस ठाणी आधुनिकीकरण व निवासस्थानाच्या दुरुस्तीही केल्या जाणार असल्याचे पालकमंत्री  केसरकर यांनी सांगितले.पुरग्रस्तांना बाहेर काढत जीवदान देणा-या व मदत करणा-या जिल्ह्यातील 65 पोलीस अधिकारी व कर्मचा-यांचा यावेळी पालकमंत्री  केसरकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस दलाने पुरग्रस्तांसाठी जमा केलेल्या 13 लक्ष 11 हजार रुपये एवढ्या मदत निधीचा धनादेशही पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी पालकमंत्री केसरकर यांच्याकडे सुपुर्द केला. तसेच गुन्हे तपासामध्ये हस्तगत करण्यात आलेला 30 लाख रुपयांचा मुद्देमाल ही संबंधित नागरिकांना सुपुर्द करण्यात आला. या पूर्वी जिल्हा पोलीस परेड मैदानावर तयार करण्यात आलेल्या किल्लाच्या प्रतिकृतीचे उद्घाटन पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते पार पाडले. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस