शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

सिंधुदुर्गात सहा वर्षात ६९८ शिबिरातून २९,७३६ पिशव्या रक्त संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 15:10 IST

गेल्या सहा वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६९८ रक्तदान शिबिराद्वारे आॅगस्ट अखेरपर्यंत २९,७३६ पिशव्या रक्त संकलन करण्यात आले.असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी दिली आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्गात सहा वर्षात ६९८ शिबिरातून २९,७३६ पिशव्या रक्त संकलनजिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती : रक्तदान शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधुदुर्ग : गेल्या सहा वर्षात जिल्ह्यात ६९८ रक्तदान शिबिराद्वारे आॅगस्ट अखेरपर्यंत २९,७३६ पिशव्या रक्त संकलन करण्यात आले.असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी दिली आहे.रक्तदान हे श्रेष्ठदान आहे याची जाणीव ठेवत सिंधुदुर्गवासीयांनी रक्तदान शिबिरांना ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, विविध मंडळे यांच्या सहकार्यातून जिल्हा रूग्णालय आणि सिंधुदुर्ग रक्तपेढी केंद्रामार्फत दरवर्षी मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरे घेतली जातात.

 ३५0 मिलीची रक्तपिशवी (ब्लडबॅग) असते. संकलित करण्यात आलेल्या रक्तापैकी आतापर्यन्त २८,२४४ रक्तपिशव्या शासकीय व खासगी रूग्णालयातील रूग्णांना देण्यात आल्या आहेत. अपघातातील गंभीर जखमींना, अनेक आजारातील रूग्णांना, शस्त्रक्रिया झालेल्या गरोदर महिलांना तसेच अनेक शस्त्रक्रियांवेळी रूग्णांना रक्ताची गरज भासते. विविध गटातील दात्यांचे रक्त या रूग्णांचे प्राण वाचवत असते. अशा रुग्णांसाठी रक्तदाते हे देवदूतच ठरत असतात. वेळीच रक्त मिळाल्याने नवीन आयुष्य त्या रूग्णांना मिळते. त्यामुळे अन्नदान तसेच विविध दानांबरोबरच रक्तदानही तेवढेच महत्वाचे आहे.सन २0१३ मध्ये १0५ शिबिरांद्वारे ५१६२ पिशव्या, सन २0१४ मध्ये ११५ शिबिरांद्वारे ५३१४ पिशव्या, सन २0१५ मध्ये १३३ शिबिरांद्वारे ५५६८ पिशव्या, सन २0१६ मध्ये १२६ शिबिरांद्वारे ५0८८ पिशव्या, सन २0१७ मध्ये १३२ कॅम्पद्वारे ५२२१ पिशव्या रक्त संकलन करण्यात आले. तर १ जानेवारी ते ३१ आॅगस्ट या कालावधीत ८७ शिबिराद्वारे ३३८३ पिशव्या रक्त संकलन करण्यात आले आहे.

ब्लड आॅन कॉल अर्थात जीवन अमृत सेवा योजनेंतर्गत सन २0१३ मध्ये ४७0 पिशव्या, सन २0१४ मध्ये ७२५ पिशव्या, सन २0१५ मध्ये ९७८ पिशव्या, सन २0१६ मध्ये ९८९ पिशव्या, सन २0१७ मध्ये ८६७ पिशव्या आणि सन २0१८ मध्ये ४४८ पिशव्या रक्त हे गरजू रूग्णांना देण्यात आले.ब्लड मोबाईल बसमधून तीन वर्षात २५७१ पिशव्यांचे संकलनवातानुकुलीत ब्लड मोबाईल बस ही सन २0१५ मध्ये राज्य रक्त संक्रमन परिषद मुंबई यांच्याकडून जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीला प्राप्त झाली. ही बस सन २0१६ पासून रक्तपेढी विभागामध्ये कार्यरत आहे.

सन २0१६ मध्ये या बसद्वारे ११ शिबिरांद्वारे ६९५ रक्तपिशव्या, सन २0१७ मध्ये १५ शिबिराद्वारे ८७८ पिशव्या, सन २0१८ मध्ये १२ शिबिरांद्वारे ९९८ अशा मिळून तीन वर्षात २५७१ पिशव्या रक्त संकलन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी दिली.

टॅग्स :Healthआरोग्यsindhudurgसिंधुदुर्गBlood Bankरक्तपेढी