सिंधुदुर्ग : सार्वजनिक विहिरीत तोल जाऊन पाण्यात पडल्याने महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 16:24 IST2018-08-07T16:21:38+5:302018-08-07T16:24:39+5:30
कणकवली तालुक्यातील फोंडाघाट-गडगेसखल येथील विवाहिता अपूर्वा लकूल गोसावी (२७) यांचा सार्वजनिक विहिरीत पडून बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी ६.३० च्या दरम्यान घडली.

सिंधुदुर्ग : सार्वजनिक विहिरीत तोल जाऊन पाण्यात पडल्याने महिलेचा मृत्यू
सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील फोंडाघाट-गडगेसखल येथील विवाहिता अपूर्वा लकूल गोसावी (२७) यांचा सार्वजनिक विहिरीत पडून बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी ६.३० च्या दरम्यान घडली.
याबाबत त्यांचे पती लकूल प्रकाश गोसावी यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अपूर्वा या सकाळी ६.३० च्या दरम्यान पिण्याचे पाणी आणण्यासाठी सार्वजनिक विहिरीवर गेल्या होत्या. त्या तोल जाऊन पाण्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला, असे तक्रारीत म्हटले आहे. अपूर्वा यांचा २० मे २०१३ रोजी लकूल यांच्याशी विवाह झाला होता.
पावसाळ्याचे दिवस असल्याने विहीर पाण्याने भरली होती. त्यामुळे मृतदेह विहिरीतून वर काढणे कठीण झाले. अखेरीस परिसरातील भोरपी समाजाच्या लोकांना बोलावून त्यांनी विहिरीत उतरून मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला.
मात्र पहिल्या प्रयत्नात त्यांना यश आले नाही. अखेरीस घळ टाकून दुपारी १.४५ च्या दरम्यान मृतदेह विहिरीतून वर काढण्यात आला. पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पोलीस अधिक तपास करीत आहेत.