शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

स्कुबा डायव्हिंगला ‘पॅडी’ची मान्यता मिळेल

By admin | Updated: October 31, 2014 00:40 IST

अ‍ॅन्ड्रेस अवूर : तारकर्लीतील सेंटर आंतरराष्ट्रीय मानांकनानुसारच

मालवण : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने तारकर्ली येथे साकारलेले स्कुबा डायव्हिंग सेंटर आंतरराष्ट्रीय मानांकनानुसारच आहे. एमटीडीसीने हे स्कुबा डायव्हिंग सेंटर उभारताना कोणत्याही त्रुटी शिल्लक ठेवल्या नाहीत. तारकर्ली स्कुबा डायव्हिंग सेंटरला ‘पॅडी’ची मान्यता मिळण्यास काहीच हरकत नाही. तसा अहवाल पॅडीला सादर करण्यात येणार असल्याचे पॅडी एशिया पॅसेफिकचे विभागीय व्यवस्थापक अ‍ॅन्ड्रेस अवूर यांनी सांगितले.पॅडी या आंतरराष्ट्रीय संस्थेशी संलग्न राहून एमटीडीसीने तारकर्ली येथील स्कुबा डायव्हिंग प्रकल्प हाती घेतला आहे. या संस्थेच्या अटी, शर्थी व मानांकनानुसार स्कुबा डायव्हिंग प्रकल्प उभारण्यात आला आहे. याची तपासणी करण्यासाठी बुधवारी पॅडी एशिया पॅसेफिकच्या अ‍ॅन्ड्रेस अवूर यांनी भेट दिली.यावेळी अ‍ॅन्ड्रेस अवूर म्हणाले, जागतिक पातळीवर स्कुबा डायव्हिंग सेंटरला मान्यता मिळण्यासाठी लागणारी सर्व मानांकने तारकर्ली स्कुबा डायव्हिंग सेंटरने पूर्ण केली आहेत. स्कुबा डायव्हिंग सेंटरमधील स्विमिंग पूल विशेष आकर्षण आहे. या सेंटरमधील क्लासरूम अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे. या सेंटरमध्ये सुरक्षितता आणि दर्जेदार प्रशिक्षण सुविधा यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. जगभरात १८० देशांपेक्षा जास्त देशांमध्ये पॅडीची मान्यता असलेली स्कुबा डायव्हिंग सेंटर आहेत. आम्हाला तारकर्ली स्कुबा डायव्हिंग सेंटरला मान्यता देण्यास विशेष आनंद वाटेल. तारकर्ली स्कुबा डायव्हिंग सेंटरवर पॅडीची मुद्रा लागावी अशीच आमची इच्छा आहे, असेही अवूर म्हणाले.महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने तारकर्ली येथे उभारलेल्या आशिया खंडातील पहिल्या स्कुबा डायव्हिंग सेंटरमध्ये अत्यंत दर्जेदार असा १० मीटर खोलीचा स्विमिंग पूल आहे. प्रशस्त क्लासरूम, संगणकीय लॅब, चेंजिंग रूम, आॅक्सिजन युनिट, फिल्टरेशन युनिट यांसह अन्य सुविधा आहेत. या सेंटरने पॅडीचे सर्व निकष पूर्ण केले आहेत. आठवडाभरात स्कुबा डायव्हिंग सेंटरला पॅडीची मान्यता मिळू शकते. पॅडीची मान्यता मिळाल्यानंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत स्कुबा डायव्हिंग सेंटर प्रशिक्षणासाठी खुले होईल, असा विश्वास अवूर यांनी व्यक्त केला.तारकर्ली येथील स्कुबा डायव्हिंग सेंटरचे उद्घाटन होण्याअगोदरच प्रशिक्षणासाठी आरक्षण सुरू झाले असल्याचे अवूर म्हणाले. जर्मनी येथील जीआयझेड या सागरी संवर्धनावरील प्रोजेक्टने तारकर्ली येथील स्कुबा डायव्हिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेण्यास उत्सुकता दाखवली आहे. याबरोबर पोलीस, नेव्ही, सागर रक्षक दल, आपत्ती व्यवस्थापकांनाही या स्कुबा डायव्हिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेणे शक्य होणार आहे. स्थानिक सागरी पर्यटन व्यावसायिकांनाही सुरक्षिततेबाबत कार्यशाळा घेण्यास पॅडी उत्सुक असल्याचे अ‍ॅन्ड्रेस अवूर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)