शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीत कडकडीत बंद

By admin | Updated: December 12, 2014 23:36 IST

वीज वितरण विरोधात एल्गार : मूक मोर्चात महिलांचा मोठा सहभाग

सावंतवाडी : चालत्या दुचाकीवर विद्युत तार पडून दोन युवक जागीच मृत झाल्याच्या निषेधार्थ आज, शुक्रवारी सावंतवाडी बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत वीज वितरण विरोधात एल्गार पुकारला. अनेक व्यापारी तसेच महिलांनी मूक मोर्चात सहभाग नोंदवला. या बंदवेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. बंदच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातून पोलीस दाखल झाले होते.आज, शनिवारी सावंतवाडीतील होळीचा खुंट भागात चालत्या दुचाकीवर विद्युत तार पडून संदीप गवस व सागर हुक्ेकरी हे दोन युवक जागीच मृत झाले होते. या घटनेनंतर सावंतवाडी शहरात महावितरण विरोधात मोठा उद्रेक पाहण्यास मिळाला. या घटनेला विद्युत विभागच जबाबदार असल्याचे सांगत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा, मृतांच्या नातेवाइकांना तातडीने मदत द्या, दोघा युवकांच्या पत्नींना नोकरीत सामावून घ्या, अशा विविध मागण्या ठेवत या घटनेनंतर नेमण्यात आलेल्या कृती समितीने आज सावंतवाडी बंदची हाक दिली होती. तसेच मूक मोर्चा काढण्याचे जाहीर करण्यात आले होते.त्याप्रमाणे सकाळी दहा वाजता विठ्ठल मंदिरात सावंतवाडी कृती समितीतील बाळ बोर्डेकर, नकुल पार्सेकर, उमेश कोरगावकर, संजू शिरोडकर, राजू पनवेलकर, जगदीश मांजरेकर, काशिनाथ दुभाषी, मनोज नाईक, आनंद नेवगी, सतीश नार्वेकर, राजू कासकर, अरुण भिसे, संजय पेडणेकर, शीला सावंत, संजना गावडे, आदींची बैठक झाली. या बैठकीनंतर या मोर्चाची सुरुवात झाली. मोर्चातील नागरिकांनीतोंडाला काळीपट्टी लावत महवितरणच्या विरोधातील फलक घेतले होते. हा मूक मोर्चा विठ्ठल मंदिरातून सुरू झाला. तो त्यानंतर उभा बाजारमार्गे गांधी चौक, जयप्रकाश चौक, संचयनी असा थेट प्रांताधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. दरम्यान, या बंदमध्ये कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच शहरातील नगरसेविका शर्वरी धारगळकर, कीर्ती बोंद्रे, वैशाली पटेकर, माधुरी मिशाळ, माजगाव सरपंच आबा सावंत, अमित परब, सुधीर आडिवडेकर, प्रशांत वाळके, प्रणील पोकळे, बबलू मिशाळ, मृत संदीप गवस यांचा भाऊ संतोष गवस, आदी सहभागी झाले होते.बंदमध्ये रिक्षा संघटनांनी सहभाग नोंदवला.सावंतवाडी बंदमध्ये रिक्षा संघटनांनीही सहभाग नोंदवत महावितरणचा निषेध केला. रिक्षा बंदमुळे अनेक प्रवासी एसटीतून उतरल्यावर पायपीट करताना दिसत होते. (प्रतिनिधी)