प्रकाश आंबेडकर यांचा वंचित पक्ष फोडण्याचे आता संजय राऊत यांचे टार्गेट; नितेश राणे यांचा आरोप
By सुधीर राणे | Updated: February 13, 2024 14:05 IST2024-02-13T14:05:00+5:302024-02-13T14:05:35+5:30
कणकवली: संजय राऊत ज्यांच्या संपर्कात जातात तो पक्ष संपतो. उद्धव ठाकरे, शरद पवार यांना अडचणीत आणल्यानंतर आता काँग्रेसला देखील ...

प्रकाश आंबेडकर यांचा वंचित पक्ष फोडण्याचे आता संजय राऊत यांचे टार्गेट; नितेश राणे यांचा आरोप
कणकवली: संजय राऊत ज्यांच्या संपर्कात जातात तो पक्ष संपतो. उद्धव ठाकरे, शरद पवार यांना अडचणीत आणल्यानंतर आता काँग्रेसला देखील ते संपवणार हे मी अगोदर बोललो होतो. आता संजय राऊत यांचे टार्गेट प्रकाश आंबेडकर हे आहेत. वंचित बहुजन आघाडी पक्ष त्यांना फोडायचा आहे. असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
कणकवलीत येथे मंगळवारी नितेश राणे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, २०१९ पासून जनमताच्या विरोधात जाऊन राजकारण कोणी 'नासवल' हे राऊत यांनी आरशात पाहिले असते तर त्यांना समजले असते. आता शेवटच्या घटका मोजणाऱ्या महाविकास आघाडीच्या फलकाला जाऊन हार घालण्याचे तेव्हढेच शिल्लक राहिले आहे. आता वंचित आघाडीकडे राऊत यांनी आपला लक्ष वळविला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी वेळीच ते ओळखावे आणि आपला पक्ष वाचवावा.
उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये तेव्हा अजित पवार, अशोक चव्हाण हे होते. तेव्हा ते तुम्हाला चांगले होते. आता आमच्या सोबत ते आल्यावर वाईट का वाटतात ? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.
काँग्रेसच्या आमदारांना पक्षात काहीच किंमत नसते !
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस पक्ष सोडताना आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.त्या खऱ्या आहेत. काँग्रेस पक्षात स्वतःच्या आमदाराना किती महत्व दिले जाते, हे मी बघितले आहे. त्यावेळी कोकणातून मी एकटा काँग्रेसचा आमदार होतो. मात्र, राहुल गांधी किंवा तत्कालीन प्रदेशाध्यक्ष मला केव्हाही भेटले नाहीत. किंवा साधी चौकशी केली नाही. त्यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतलेला निर्णय अतिशय योग्य होता.तसाच आजचा अशोक चव्हाण यांचा सुद्धा निर्णय योग्यच आहे,असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.