शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

संजय पडते शिवसेनेत

By admin | Updated: February 1, 2015 00:37 IST

राणेसमर्थक : कुडाळ तालुक्यात काँग्रेसला खिंडार

कुडाळ : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे खंदे समर्थक माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय पडते यांनी ‘मातोश्री’वर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्याबरोबर माजी सरपंच प्रशांत राणे यांच्यासह एका ग्रामपंचायत सदस्याने शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे कुडाळ तालुक्यात काँग्रेसला खिंडार पडणार, हे निश्चित झाले आहे. गेले अनेक दिवस नाराज असलेले संजय पडते व त्यांच्या पत्नी कुडाळच्या सरपंच स्नेहल पडते यांनी नारायण राणेंची साथ सोडत पुन्हा एकदा शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधले आहे. त्यांच्यासोबत माजी सरपंच प्रशांत राणे, काँग्रेसचेच ग्रामपंचायत सदस्य नंदू कुंटे व युवक काँग्रेसचे चेतन पडते या सर्वांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, बेस्टचे अध्यक्ष अरुण दुधवडकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक, विष्णू कोरगावकर, संदीप राऊळ, नितीन सावंत, मिथुन वजराटकर, आदी उपस्थित होते. यावेळी संजय पडते म्हणाले, आमची राजकीय कारकीर्द शिवसेनेतून सुरुवात झाली असून, नारायण राणे यांच्यासोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, येथील नेतृत्वामुळे आमची घुसमट होत होती. त्यामुळे नारायण राणे व काँगे्रसची साथ सोडण्याचा आम्ही विचार केला व जेथून आमची राजकीय कारकीर्द सुरू झाली तेथेच परत जाण्याचा निर्णय घेतला. संजय पडते नाराज असून पक्ष सोडणार, अशी चर्चा गेले काही दिवस जोरदार सुरू होती. आज, शनिवारी दुपारी १२ वाजता ‘मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश करून या सर्व चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला. शिवसेनेत असताना संजय पडते, काका कुडाळकर यांनी संपूर्ण जिल्ह्यात पक्षाची घोडदौड केली. मात्र, काका कुडाळकर यांच्या भाजप प्रवेशामुळे व संजय पडते यांच्या शिवसेना प्रवेशामुळे कुडाळमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार पडणार, हे निश्चित झाले आहे. (प्रतिनिधी) शहर होणार भगवेमय ? संजय पडते यांचे कार्यकर्ते जिल्ह्यातील विशेषत: कुडाळ तालुक्यातील गावागावांत आहेत. पडते हे विविध युनियनचे पदाधिकारी असून, कुडाळ शहरातही त्यांचे समर्थक असल्याने कुडाळ शहर हे भगवेमय होणार की नाही, हे पाहणे गरजेचे आहे. एकंदरीत पाहता राजन तेली, काका कुडाळकर, संजय पडते यांच्यासारख्या राणेंच्या खंद्या समर्थकांनी राणेंची साथ सोडल्यामुळे येथील काँगे्रसला मोठा धक्का बसला आहे.