शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
3
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
4
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
5
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
6
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
7
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
8
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
9
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
10
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
11
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
12
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
13
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
14
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
15
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
16
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
17
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
18
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
19
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
20
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या तीन शिकाऱ्यांना पकडले

By admin | Updated: September 26, 2015 00:17 IST

जामिनावर सुटका : बंदूक, १३ काडतुसे, दुचाकी जप्त

वैभववाडी : वन्यप्राण्यांच्या बेकायदा शिकारीसाठी फिरणाऱ्या सांगशी-गगनबावडा (जि. कोल्हापूर) येथील तिघांना पोलिसांनी भुईबावड्यानजीक पकडले. त्यांच्या ताब्यातील डबल बोअर बंदूक, १३ जिवंत काडतुसे आणि दुचाकी जप्त केली आहे. ही कारवाई विभागीय गस्तीवरील पथकाने मध्यरात्री दोनच्या सुमारास केली. त्या तिघांना देवगड न्यायालयात हजर केले असता त्यांना जामिनावर सोडले.वैभववाडीचे पोलीस निरीक्षक कैलास बर्वे गुरुवारी रात्री विभागीय गस्तीवर होते. त्यांच्यासमवेत सहाय्यक उपनिरीक्षक बी. आर. शिंगाडे, हवालदार राजेंद्र नानचे, बी. एस. चिले, आदी पोलिसांचे पथक होते. गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास या पथकाला भुईबावड्यानजीकच्या हेत खिंडीत एका दुचाकीवरून फिरणारे तिघे आढळून आले. त्यांना थांबवून चौकशी करताना त्यांच्याजवळ डबल बोअर काडतूस बंदूक, १३ जिवंत काडतुसे सापडली. त्यामुळे त्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सुनील शंकर पडवळ (वय ४०), सागर भगवान पडवळ (१९) व अक्षय नारायण पडवळ (२०, सर्व रा. सांगशी-गगनबावडा) अशी त्यांची नावे आहेत. आपण शिकारीसाठी भुईबावडा घाटमार्गे आल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यांच्या ताब्यातील दुचाकीची (क्रमांक - एम एच ०९ ; सी टी २५३३) कागदपत्रेही यांच्याजवळ नव्हती. त्यामुळे बंदूक, १३ जिवंत काडतुसे आणि दुचाकी पोलिसांनी जप्त केली.तिघांना अटक करून देवगड न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना जामिनावर सोडले. गेल्या वर्षभरात वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी फिरणाऱ्यांवर झालेली ही दुसरी कारवाई आहे. या कारवाईमुळे वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. (प्रतिनिधी)