Sindhudurg: सार्वजनिक बांधकाम कार्यालयाची तोडफोड; आमदार वैभव नाईक यांच्यासह दोघां विरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 18:10 IST2024-08-27T18:10:19+5:302024-08-27T18:10:28+5:30

मालवण: राजकोट किल्ला येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या नंतर संतप्त होवून आमदार वैभव नाईक यांच्यासह अन्य शिवप्रेमींनी सार्वजनिक बांधकाम ...

Sabotage of Public Works Office; A case has been registered against MLA Vaibhav Naik and two others | Sindhudurg: सार्वजनिक बांधकाम कार्यालयाची तोडफोड; आमदार वैभव नाईक यांच्यासह दोघां विरोधात गुन्हा दाखल

Sindhudurg: सार्वजनिक बांधकाम कार्यालयाची तोडफोड; आमदार वैभव नाईक यांच्यासह दोघां विरोधात गुन्हा दाखल

मालवण: राजकोट किल्ला येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या नंतर संतप्त होवून आमदार वैभव नाईक यांच्यासह अन्य शिवप्रेमींनी सार्वजनिक बांधकाम कार्यालयाची तोडफोड केली होती. या प्रकरणी काल रात्री उशिरा आमदार नाईक यांच्यासह अन्य दोघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काल दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान कोसळला या या घटनेमुळे शिवप्रेमी संतप्त बनले होते आमदार वैभव नाईक यांनी घटनास्थळी भेट देत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढत तीव्र संताप व्यक्त केला होता. त्यानंतर दुपारी आमदार वैभव नाईक यांच्यासह उबाठा गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी यांच्यासह अन्य शिवप्रेमी यांनी मेढा येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयात जात कार्यालयातील साहित्याची, खिडक्यांची तोडफोड केली होती. 

याप्रकरणी काल रात्री उशिरा पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार तिघां विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. यशवंते हे अधिक तपास करत आहेत.

Web Title: Sabotage of Public Works Office; A case has been registered against MLA Vaibhav Naik and two others