शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांनी राज्यावर नांगर फिरविला : राज

By admin | Updated: October 12, 2014 01:04 IST

सावंतवाडीत घणाघात : प्रचारसभेत चारही पक्षांना केले टार्गेट

सावंतवाडी : राज्यातील चारही प्रमुख पक्षांची अवस्था दयनीय आहे. त्यांनी जनतेला गृहीत धरले आहे. नीतीमत्ता नावाची गोष्ट नाही, राज्यकर्ते नालायक आहेत, त्यापुढे जाऊन विरोधी पक्षही नालायक आहे. राज्यातील स्थिती भयावह आहे, एकीकडे राज्यात ६० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, दुष्काळ वाढत चाललाय. सत्ताधाऱ्यांनी तर महाराष्ट्रावर नांगर फिरविला, अशा ठाकरी शैलीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज, शनिवारी चौफेर टीकेची झोड उठविली. ते सावंतवाडी येथे प्रचारसभेत बोलत होते.राज ठाकरे यांची जाहीर सभा आज, शनिवारी येथील जिमखाना मैदानावर झाली. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ही सभा होत असल्याने मैदान गर्दीने तुफान भरून गेले होते. यावेळी व्यासपीठावर मनसे नेते शिरीष पारकर, मनसे कोकण संघटक परशुराम उपरकर, अनिल शिदोरे, कोल्हापूरचे उमेदवार सुरेश साळोखे, जिल्हाध्यक्ष शैलेश भोगले, धीरज परब, चैताली भेंडे, भारती रावराणे, आदी उपस्थित होते.भाजपकडे नीतीमत्ता नाहीयावेळी ठाकरे म्हणाले, भाजपकडे नीतिमत्ता राहिली नाही. त्यांचे पंतप्रधान येऊन महाराष्ट्रात मते मागत आहेत. ही मते कोणासाठी मागतात? काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आलेल्या ६० जणांसाठी मागत आहेत का? ज्या पक्षाने विधानसभेत बबनराव पाचपुते, विजयकुमार गावित यांच्यावर टीका केली. भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान फिरत आहेत, यावरूनच भाजपची नीतीमत्ता कळते.आघाडी सरकारने महाराष्ट्राचे वाटोळे केले आहे. अनेक बाबतीत महाराष्ट्राला मागे नेऊन ठेवले आहे. राज्याचा विकास पर्यटनमधून होऊ शकतो. प्रचंड ताकद पर्यटनमध्ये असताना यांच्याकडे साधा आराखडाही नाही. राज्याला पर्यटनातून दहा ते बारा हजार कोटी आणि दहा ते बारा हजार युवकांना काम मिळवून देईल, असा आराखडा तयार आहे.हापूस आंबा भय्या विकतोकोकण आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. पण आंबा प्रकिया उद्योग दिसत नाही. सभा तीन तास उशिरा सुरूमनसेची सभा सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आली होती. मात्र, राज ठाकरे हे तीन तास उशिरा आल्याने ही सभा दुपारी १ वाजता सुरू झाली. तरीही भर उन्हात गर्दी तशीच टिकून होती.राज ठाकरे यांनी भाजपवर टीका करीत असताना भाजप उमेदवार राजन तेली यांचे नाव न घेता टीका केली. पहिले जनता दल, नंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष आणि त्यानंतर अचानक भाजप असे पक्षांतर त्यांनी केले आहे. काँग्रेस सोडल्यानंतर अवघे सात दिवस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिले. त्यांना तो पक्ष सहा रात्री आणि सात दिवसांचा हनिमून पॅकेज वाटला काय? अशी टीका ठाकरे यांनी केली.