शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
4
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धाराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
5
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
6
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
7
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
8
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
9
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
10
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
11
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
12
Maharashtra Din 2026 Wishes: महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मराठमोळा सण
13
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
14
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
15
१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!
16
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
17
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
18
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
19
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
20
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
Daily Top 2Weekly Top 5

आचिर्णे येथे ‘रॉकेट’ची चाचणी

By admin | Updated: September 30, 2014 00:23 IST

किरण नाईक : अवकाशात न उडविता जमिनीत पुरून क्षमता तपासली

वैभववाडी : साखरेच्या इंधनावर अवकाशात १० किलोमीटरचा टप्पा गाठू शकण्याची क्षमता असलेल्या ज्ञानज्योती सिव्हीलियन रॉकेटची यशस्वी चाचणी आचिर्णेच्या माळरानावर रविवारी घेण्यात आली. रॉकेट अवकाशात न उडविता जमिनीत पुरून त्याची क्षमता तपासण्यात आली, अशी माहिती इंटरनॅशनल इंडियन युनिर्व्हसिटी (आयआययु)चे कुलगुरू किरण नाईक यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.आचिर्णेच्या माळरानावर ११ आॅगस्ट रोजी ४.५ किलोमीटर क्षमतेच्या सिव्हीलियन रॉकेटची चाचणी तांत्रिक दोषामुळे अयशस्वी ठरली होती. त्याचवेळी कुलगुरू किरण नाईक यांनी याच ठिकाणी अल्पावधीतच चाचणी यशस्वी करून दाखवू, असा विश्वास व्यक्त केला होता. त्यानुसार शनिवार व रविवार हे दोन दिवस नाईक यांच्यासह आयआययुच्या शास्त्रज्ञांचे पथक ही मोहीम यशस्वी करण्यात गुंतले होते. कुलगुरू नाईक म्हणाले, मागचा अनुभव लक्षात घेता अधिक काळजीपूर्वक रॉकेट बनविण्यात आले होते. १० किलोमीटरचा टप्पा गाठू शकणाऱ्या ज्ञानज्योती रॉकेटची चाचणी घेण्यापूर्वी २.५ किलोमीटर क्षमतेच्या ज्ञानांजली या रॉकेटची यशस्वी चाचणी घेतली. त्यानंतर वातावरण आणि जागेच्या उपलब्धतेचा विचार करून जमिनीमध्ये पुरून १० किलोमीटरचा टप्पा गाठू शकणाऱ्या ज्ञानज्योती रॉकेटची चाचणी घेऊन त्याची क्षमता तपासण्यात आली. त्यानुसार ज्ञानज्योती हे रॉकेट ४.५ किलोमीटर ते १० किलोमीटरच्या टप्प्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा वापर अतिवृष्टी, गारपीट टाळणे, खनिज संपत्ती शोधणे, कृत्रीम पाऊस पाडण्यासाठी करण्यात येणार आहे.पत्रकार परिषदेत सिव्हीलियन रॉकेट तंत्रज्ञानाचे संशोधक राजेश मुनेश्वर आयआययुच्या वेदीक सायन्स विभागाचे प्रमुख व आचिर्णेचे सुपूत्र प्रसाद राणे उपस्थित होते. चाचणीबाबत प्रचंड गुप्तता पाळली गेली होती. मात्र सांगुळवाडी कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांना रॉकेट तंत्रज्ञानाची माहिती शास्त्रज्ञांनी दिली. (प्रतिनिधी)लक्ष्य १०० किलोमीटरचेसिव्हिलियन रॉकेटच्या १० किलोमीटर टप्प्याची यशस्वी चाचणी घेतल्यानंतर आता १०० किलोमीटर टप्प्याच्या रॉकेट चाचणीवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. इंधन म्हणून साखरेचा वापर करून केरळ येथील तुंबाया डिफेन्सच्या जागेत १०० किलोमीटर अंतर गाठणाऱ्या रॉकेटची चाचणी घेण्यात येईल, असे आयआययुचे कुलगुरू किरण नाईक यांनी स्पष्ट केले.