शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
3
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
4
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
5
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
6
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
7
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
8
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
9
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
10
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
11
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
12
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
13
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
14
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
15
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
16
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
17
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
18
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
19
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
20
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोर अखेर रिंगणाबाहेर

By admin | Updated: January 7, 2015 23:54 IST

लांजा नगरपंचायत : अर्ज मागे घेण्याच्या अखेरीसही हेका कायम

लांजा : लांजा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांना बंडखोरीची लागण झाल्याने त्यांची मनधरणी करुनही पक्षातील पदाधिकारी बंडखोरांना थंड करण्यात यशस्वी होऊ शकले नाहीत. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशीही बंडखोरांनी आपला पवित्रा बदलण्यास नकार दिला. म्हणून निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला मोठ्या प्रमाणात डोकेदुखी होणार आहे.निवडणुकीचा अर्ज भरण्यापूर्वी तुम्ही कामाला लागा, असा आदेश मिळाल्याने व प्रामाणिकपणे पक्षाचे काम करत असतानाही पक्षाने उमेदवारी नाकारल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले, तसेच अर्ज छाननीच्या दिवशी पक्ष आपल्या अर्जाचा विचार करेल, अशी भावना असणाऱ्या बंडखोर उमेदवारांना ए बी फॉर्म पक्षाने न दिल्याने आपले अर्ज कायम ठेवून निवडणूक अपक्ष लढवण्याचा पवित्रा घेतला. त्यानंतर सोमवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असल्याने बंडखोरांची मनधरणी करुन अर्ज मागे घेतले जातील, अशी अपेक्षा होती. मात्र, बंडखोरांनी आपला निर्णय ठाम ठेवल्याने ८ प्रभागात बंडखोर आपल्या बंडाचे निशाण हाती घेऊन अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.प्रभाग १ मधून चौरंगी लढत होत असली तरी भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. प्रभाग २ मधून तिरंगी लढत होत असली तरी सेनेच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे. प्रभाग ३ मध्ये तिरंगी लढत होणार आहे. मात्र, सेनेचा बंडखोर उभा आहे. प्रभाग ४ मध्ये चौरंगी लढत होत असून, सेनेतूनच बंडखोरी केली आहे. प्रभाग ५ मधून चौरंगी लढत होत असली तरी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. प्रभाग ६ मध्ये तिरंगी लढत असून, या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार नाही. प्रभाग ७ मध्ये तिरंगी लढत होत असून या ठिकाणी राष्ट्रवादीने आपला उमेदवार उभा केलेला नाही. प्रभाग ८ मध्ये तिरंगी लढत होत असून, सेनेच्या अधिकृत उमेदवाराने अपक्षाला पाठिंबा दिला असल्याचे समजते. प्रभाग ९ मधून चौरंगी लढत होत आहे. येथे भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. प्रभाग १० मधून चौरंगी लढत होत आहे. प्रभाग ११ मध्ये चौरंगी लढत, प्रभाग १२ मधून चौरंगी लढत होणार, प्रभाग १३ मधून सेनेत बंडखोरी तसेच काँग्रेसमध्येदेखील बंडखोरी झाली असून सर्वात जास्त उमेदवारांनी या प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.येथे चौरंगी लढत होणार आहे. प्रभाग १४ मध्ये चौरंगी लढत, प्रभाग १५ मध्ये तिरंगी लढत, प्रभाग १६ मध्ये तिरंगी लढत, प्रभाग १७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज मागे घेतल्याने अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिला असून, येथे सेना आणि अपक्ष उमेदवार अशी दोघात लढत होणार आहे. निवडणूक जवळ येत असल्याने नगरपंचायत निवडणुकीत सारेच उमेदवार कामाला लागले आहेत. (प्रतिनिधी)