शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांमुळे जिल्ह्याच्या विकासाला खीळ : राणे

By admin | Updated: August 18, 2015 00:39 IST

मेळाव्यात टीका : पाचशे कोटींतील तीनशे कोटी मागील सरकारचे

सावंतवाडी : पाचशे कोटींचा हिशेब सांगणाऱ्या पालकमंत्री केसरकर यांनी तीनशे कोटी मागील सरकारने दिले आहेत, याचे भान ठेवावे. या पालकमंत्र्यांमुळे जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसली असून साखर, गूळ देऊन लोकांना लाचार बनविण्यापेक्षा सक्षम बनवा, अशी टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पालकमंत्र्यांवर केली. ते सावंतवाडी येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्याला जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, तालुकाध्यक्ष संजू परब, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, डॉ. जयेंद्र परुळेकर, संदीप कुडतरकर, महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे, सभापती प्रमोद सावंत, प्रमोद कामत, पंढरी राऊळ, अन्वर खान, शहर अध्यक्ष मंदार नार्वेकर, अ‍ॅड. दिलीप नार्वेकर, युवक जिल्हाध्यक्ष आनंद शिरवलकर, शिक्षण सभापती गुरू पेडणेकर, दिलीप भालेकर, प्रमोद गावडे, रवींद्र मडगावकर, माजी सभापती प्रियंका गावडे, आदी यावेळी उपस्थित होते. नारायण राणे म्हणाले, अच्छे दिन म्हणणाऱ्यांनी येथील जनतेला बुरे दिन दाखविण्यास सुरुवात केली आहे. अनेक आश्वासनांना आपण भुलून त्यांना मते दिली, पण आता काय वाट्याला आले ते प्रत्येकाने बघावे. राज्याचे मुख्यमंत्री तर हे करू आणि ते करू सांगतात. त्यांना निधीचे नियोजन कसे करावे, हे माहीत नाही. हे राज्यातील सरकार जास्त दिवस टिकेल असे वाटत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. विद्यमान पालकमंत्र्यांना विधानसभेत बोलता येत नाही. निधी कोण देतो हे माहीत नाही. ते ५०० कोटींचा हिशेब सांगत आहेत. त्यातील चिपी विमानतळाचे काम यापूर्वी खासगी कंपनीला काँग्रेसच्या काळात ‘बांधा वापरा व हस्तांतर करा’ या तत्त्वावर दिले आहे, तर पर्यटनासाठी आलेले शंभर कोटी केंद्र सरकारने काँग्रेसच्या काळातच दिले आहेत. तीनशे कोटींचा निधी हा मागील सरकारचा आहे. उर्वरित दोनशे कोटी हे पालकमंत्र्यांचे कर्तृत्व नसून हा निधी प्रत्येक सरकारकडून बांधकाम तसेच अन्य कामासाठी येतच असतो. निवडणुकीत साखर, गूळ देऊन लोकांना लाचार बनविण्यापेक्षा त्यांना सक्षम बनवा, असा सल्लाही यावेळी राणे यांनी दिला आहे. मी काय केले म्हणणाऱ्यांनी सी-वर्ल्ड, उत्तम स्टील कंपनी, विमानतळ, रेडी बंदर कोणी आणले ते सांगावे, असे आव्हान यावेळी राणे यांनी दिले. कार्यकर्त्यांनी पराभवाच्या छायेतून बाहेर येऊन काम करावे. तालुकाध्यक्ष म्हणून नेमणूक केल्यानंतर संजू परब यांनी विश्वास सार्थ केला, असे राणे म्हणाले. जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी पालकमंत्री, भाजप व शिवसेनेवर जोरदार टीका केली. या मेळाव्यात शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमधून गेले ते लोंबकळत राहिले : अ‍ॅड. नार्वेकर काँग्रेस पक्ष सोडला त्यांची अवस्था बघा. काँग्रेस हा महासागर असून पक्ष विकासातून घडतो व निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर उभा असतो, असे सांगत अ‍ॅड. नार्वेकर यांनी काँग्रेसमधून गेलेले सध्या लोंबकळत असल्याची टीका केली.