शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा टक्का घसरला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2015 23:14 IST

शेतकरी हताश : यंदा पाणी टंचाईचे संकट भीषण?

रत्नागिरी : पावसाळ्याच्या चार महिन्यांतील तीन महिने संपत आले आहेत. या कालावधीत गतवर्षीच्या तुलनेत पर्जन्यमानाचा टक्का खुपच घसरला आहे. जिल्ह्यात जेमतेम पन्नास टक्के पाऊस झाला असून उरलेल्या एक महिन्याच्या काळात पाऊस पन्नास टक्क्यांचा उर्वरित कोटा भरून काढणार की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे. पिवळे पडल्याने भातपिकाचे नुकसान झाले आहेच, परंतु पुरेसा पाऊस न झाल्यास डिसेंबरमध्येच जिल्ह्याला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे. यंदाच्या पावसाळ्यात जून महिन्यात पहिल्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे बळीराजा सुखावला. परंतु त्यानंतर पावसाने आठवडाभर दांडी मारल्याने शेतीचे भवितव्य धोक्यात आले. पावसाने पुन्हा हजेरी लावली. त्यामुळे लावणी केलेले भात रोपांनी पुन्हा बाळसे धरले. आता पीक चांगले येईल, अशी आशा धरून बसलेल्या शेतकऱ्यांना पावसाने पुन्हा दगाच दिला. गेल्या दोन महिन्यांच्या काळात पाऊस गायबच आहे. कधीतरी एखादी सर आली तर आली, अशी स्थिती आहे. आॅगस्ट हा पावसाचा तिसरा महिना संपायला आला, तरी पावसाचे दमदार आगमन अद्यापही झालेले नाही. भातपिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. पाण्याच्या अभावाने शेत पिवळे पडले आहे. येत्या आठवडाभरात दमदार पावसाचे आगमन झाले नाही तर मात्र शेती करपण्याची शक्यता आहे. एकुणच पावसाच्या लहरीपणामुळे यंदा भातपीक ५० टक्के तरी हाती येईल का, याबाबात साशंकता व्यक्त होत आहे. पावसाने दांडी मारल्याने शेतीचे नुकसान होणार हे स्पष्ट झालेले असतानाच या महिनाभरात पावसाने आपला उर्वरित कोटा पूर्ण न केल्यास नोव्हेंबर, डिसेंबरपासून भीषण पाणी टंचाईचे सावटही जिल्ह्यासमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे.आधीच साडेतीन हजार ते चार हजार जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान असताना यावर्षी सुमारे तीन महिन्यात केवळ १८०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे साडेतीन ते चार हजार सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण पन्नास टक्के एवढेच आहे. येत्या आठवडाभरात पुन्हा जोरदार पावसाला सुरूवात होईल व पावसाचा राहिलेला कोटाही पूर्ण होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे हा अंदाज खरा ठरला तर पाणीसंकट टळेल. मात्र, तसे झाले नाही तर डिसेंबरपासूनच भीषण पाणी टंचाईला जिल्ह्यास सामोरे जावे लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.मंगळवारी रात्रीपासून शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र, बुधवारी दिवसभर वातावरण स्वच्छ होते. त्यामुळे पुन्हा गरमीला सुरुवात झाली. हुलकावणी देणाऱ्या पावसामुळे उभारणीला येत असलेली लावणी पुन्हा सुकण्याच्या स्थितीत आली असून, शेतकरी चिंतेत सापडला आहे. (प्रतिनिधी)पाणीटंचाईचे सावट !राज्यातील केवळ नागपूर व अमरावती या दोन जिल्ह्यांतच शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाल्याची नोंद आहे. कोकणातील रत्नागिरीसह अन्य जिल्ह्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पावसाचे कमी प्रमाण लक्षात घेऊन पाणी आरक्षणाचा निर्णय झाला असून, केंद्रानेही राज्याला मदत दिली आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात पावसाची टक्केवारी वाढली नाही तर डिसेंबरपासूनच पाणीटंचाईची भीषण स्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला असून त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.हवामान खात्याचा अंदाज खरा ठरणार?येत्या आठवडाभरात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होईल व राज्यात कोकणसह सर्वत्र मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे पन्नास टक्के पर्जन्यमान असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात या अंदाजानुसार मुसळधार पाऊस पडेल काय, असा सवाल निर्माण झाला आहे.