शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

जनसुनावणी पुन्हा लांबणीवर

By admin | Updated: July 16, 2015 01:08 IST

मठ येथील मायनिंग : ग्रामस्थांच्या विरोधामुळे प्रशासन झुकले

वेंगुर्ले : मठ येथील मायनिंगला स्थानिकांचा होणारा विरोध जनसुनावणीतून दिसून आला. मायनिंगला विरोध करणाऱ्यांनी एकीचे बळ दाखविल्याने अखेर प्रशासनालाही लोकांच्या विरोधापुढे झुकावे लागले. कंपनीने पर्यावरणविषयक अहवाल पुन्हा इंग्रजीतून दिल्याने त्याचे पडसाद सुनावणीस्थळी उमटले. अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ही जनसुनावणी पुढे ढकलण्यात आली. दोन महिन्यांपूर्वी सतये मठ येथे होणाऱ्या सिलिका मायनिंगची जनसुनावणी वेंगुर्ले येथे होणार होती; पण सासवान मिनरल्स अ‍ॅन्ड केमिकल्स प्रा. लि. मुंबई या कंपनीने आपला पर्यावरणविषयक अहवाल मराठीतून न देता इंग्रजीतून दिल्याने स्थानिकांनी तीव्र विरोध केला. त्याची दखल खुद्द पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी घेत जनसुनावणी स्थगित केली होती. तसेच कंपनीला पर्यावरणविषयक अहवाल मराठीतून सादर करण्याचे आदेश दिले होते.यानंतर बुधवारी वेंगुर्ले येथील सिद्धिविनायक सभागृहात जनसुनावणी होती. यावेळी उपप्रादेशिक पर्यावरण अधिकारी एल. टी. रणदिवे व उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड उपस्थित होते. वेंगुर्लेसह संपूर्ण सिंधुदुर्गमधून आलेल्या लोकप्रतिनिधी, मायनिंग विरोधी कृती समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पर्यावरणविषयक अहवाल मराठीतूनच द्या, अशी जोरदार मागणी लावून धरली. मायनिंग विरोधी लोकांनी केलेली घोषणाबाजी, प्रशासनाच्या प्रत्येक शब्दाला होणारा तीव्र विरोध यामुळे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तोंड उघडायलाच संधी मिळत नव्हती. उपजिल्हाधिकारी खुटवड यांनी लोकांना शांत बसून सुनावणी ऐकण्याची विनंती केली; पण लोकांनी कंपनी प्रेझेंटेशन दाखवीत असलेल्या प्रोजक्टरची वायरही काढण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)शिवसेनेच्याभूमिकेबाबत संभ्रमजनसुनावणीचे कामकाज सुरू असतानाच तेथे भाजपसह इतर पक्षांचे पदाधिकारी मायनिंगला विरोध करताना दिसत होते; पण शिवसेनेचे मोठे नेते उपस्थित नव्हते. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेबाबत संभ्रम वाटत होता.जिल्हाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप; सुनावणीला स्थगितीजनसुनावणीचे कामकाज सुरू झाल्यानंतर झालेला विरोध यामुळे पुढे कोणतेच कामकाज झाले नाही. तसेच गदारोळही मोठ्या प्रमाणात वाढला होता. पोलीसही गदारोळामुळे गोंधळात पडले होते. कोणतीच भूमिका घेता येत नव्हती. अखेर उपजिल्हाधिकारी खुटवड यांनी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्याशी संपर्क साधत घडलेल्या प्रकारची माहिती दिली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणीला स्थगिती देण्याचे आदेश दिले.