शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेकडून कदम यांचा निषेध

By admin | Updated: November 28, 2014 00:03 IST

काँग्रेस पक्षाकडून विरोधात अथवा स्पष्टीकरणात्मक प्रतिक्रिया अपेक्षित असताना पार्टीकडून प्रतिक्रीया व्यक्त नाही़

मंडणगड : आमदार संजय कदम यांनी बुधवारी (दि. २६) मंडणगड पंचायत समितीत घेतलेल्या अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत सभेच्या समारोपात सध्या प्रकृती अस्वास्थ्याने रुग्णालयात असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए़ आऱ अंतुले हे आपल्यात राहिले नसल्याचे सांगितले. याचबरोबर त्यांच्या मृत आत्म्याला सभागृहाच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. वास्तवात तसे काही घडल्याचे कोणतेही वृत्त नसल्याने आमदारांच्या या कृत्याचे विरोधी पक्षाकडून तालुक्यात पडसाद उमटले. मंडणगड तालुका शिवसेनेतर्फे पोलिसांना निवेदन देऊन कदम यांच्याबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला.
शिवसेना तालुका शाखेच्यावतीने कदम यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. आज सायंकाळी ४ वाजता येथील मुख्य चौकात शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजकुमार निगुडकर, तालुकाप्रमुख संतोष घोसाळकर, शहर प्रमुख विनोद जाधव, विभागप्रमुख प्रताप घोसाळकर, भाविसे तालुकाधिकारी मंगेश दळवी, शिरगावचे उपसरपंच इरफान बुरोंडकर, संतोष पार्टे, नितीन पवार, जितेंद्र साळवी या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे, मंडणगड व तहसीलदार कविता जाधव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर सभापती वैशाली चोरगे, उपसभापती आदेश केणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजकुमार निगुडकर, तालुकाप्रमुख संतोष घोसाळकर यांच्या सह्या आहेत, तर समाजकल्याण सभापती शीतल जाधव यांचे नाव आहे. यासंदर्भात मंडणगड शिवसेना तालुकाप्रमुख संतोष घोसाळकर यांनी पोलिसात तक्रार करणार असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, यासंदर्भात काँग्रेस पक्षाकडून विरोधात अथवा स्पष्टीकरणात्मक प्रतिक्रिया अपेक्षित असताना पार्टीकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रीया व्यक्त करण्यात आलेली नाही़ (प्रतिनिधी)