कणकवली : कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी रात्री अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बागायतदारामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे .गुरुवारी सकाळपासूनच सर्वत्र ढगाळ वातावरण होते. सध्या पहाटेला थंडी तर दुपारी उष्णतेचे प्रमाण वाढत आहे . मात्र, गुरुवारी रात्री अचानक काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह विजांचा लखलखाट करत मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे लोकांना एकाच दिवसात तीन ऋतू अनुभवायला मिळाले . या बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे .वेंगुर्ला, सावंतवाडी आदी भागातही पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी पहाटेही अनेक ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला असला तरी दुपारी १२ वाजल्यानंतर पुन्हा वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढले होते.
सिंधुदुर्गात अवकाळी पावसाची हजेरी,बागायतदार चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 14:07 IST
Rain Kankavli Sindhudurg- कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी रात्री अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बागायतदारामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे .
सिंधुदुर्गात अवकाळी पावसाची हजेरी,बागायतदार चिंतेत
ठळक मुद्देसिंधुदुर्गात अवकाळी पावसाची हजेरीबागायतदार चिंतेत