शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

दर्याचा राजा झालाय मासेमारीसाठी सज्ज

By admin | Updated: August 1, 2015 00:22 IST

मोठ्या नौका किनारीच : हवामान बदलाची भीती

मालवण : भारताच्या पूर्व-पश्चिम किनारपट्टीवरील शासनाने लागू केलेला १ जून ते ३१ जुलै हा पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी संपल्याने नव्या मासेमारी हंगामाचा श्रीगणेशा काही मच्छिमारांनी केला आहे, असे असले तरी नारळी पौर्णिमेपर्यंत हवामान बदल होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. समुद्र शांत असल्याने शुक्रवारी अनेक मच्छिमारांनी आपल्या नौका आज समुद्रात लोटत नव्या मासेमारी हंगामाचा श्रीगणेशा केला. मात्र, मोठ्या नौका अद्याप किनाऱ्यावरच सुरक्षित ठिकाणी उभ्या आहेत. गेल्या काही वषार्तील मच्छिमारांतील वादाची स्थिती पाहता मत्स्य विभाग, बंदर विभाग सतर्क झाला असून पोलिस प्रशासनानेही खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.केंद्र शासनाने राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर १ जून ते ३१ जुलै या २महिन्याच्या कालावधीत मासेमारी बंदी जारी केली होती. ही बंदी आज, ३१ जुलै रोजी संपत आहे. आगामी काळात समुद्रात पाऊस व वादळी वाऱ्याचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या हंगामात होणाऱ्या वादळी वाऱ्यात नौकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. छोट्या नौका मासेमारी करून तात्काळ किनाऱ्यावर पोहचू शकतात. त्यामुळे किनाऱ्यावर बंदिस्त ठेवलेल्या नौका जागेवरच आहे. बदलत्या हवामानामुळे आगामी काही दिवस अघोषित मासेमारी बंदी राहणार आहे. मत्स्य विभागानेही आगामी महिनाभराच्या कालावधीत पावसाळी हवामान तसेच वादळी वारे याचा अंदाज घेऊनच मासेमारी करण्याच्या सूचना मच्छिमारांना केल्या आहेत. (वार्ताहर)अनधिकृत मासेमारीवर कडक कारवाई व्हावी मासेमारी बंदी कालावधी संपल्याने पुन्हा गोवा, कर्नाटक, गुजरात राज्यातील ट्रॉलर्सचा सिंधुदुर्ग किनारपट्टीवर हैदोस घालतात. त्यामुळे गतवर्षीसारखे आक्रमण उदभवण्याची शक्यता आहे. स्थानिक व परराज्यातील अनधिकृत मासेमारीवर मत्स्य विभागाने दिलेल्या आश्वासनानुसार कारवाई करावी, अशी मागणी मालवण तालुका श्रमिक संघ, श्रमजीवी रापण संघ यांनी निवेदनाद्वारे मत्स्य विभाग सहाय्यक मत्स्य आयुक्त यांना केली आहे.