शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
4
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
5
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
6
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
7
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
8
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
9
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
10
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
11
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
12
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
13
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
14
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
15
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
16
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
17
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
18
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
19
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
20
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसच प्रात:विधीसाठी उघड्यावर

By admin | Updated: October 1, 2015 22:39 IST

दोडामार्गातील वीजघर नाक्यावरील प्रकार : प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगणारे उदाहरण--लोकमत विशेष

गजानन बोंद्रे -साटेली भेडशी -शासन एकीकडे निर्मल ग्रामसाठी अविरत झटत आहे. गावोगावी आणि घरोघरी स्वच्छतेचा मंत्र दिला जात आहे. उघड्यावर शौचालयास जाण्यास दंडात्मक कारवाईही करण्यात येत आहे. पण शासनाचे सेवक अणि जनतेचे संरक्षक म्हणून ओळखले जाणारे पोलीस कर्मचारीच जर उघड्यावर प्रात:विधीसाठी (शौचालयास) जात असतील तर काय म्हणावे? पण हे गंभीर वास्तव आहे दोडामार्ग तालुक्यातील वीजघर येथील तपासणी नाक्यावरचे. सिंधुदुर्ग-कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमारेषेवर असणाऱ्या या तपासणी नाक्याच्या इमारतीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. चारी बाजूंनी पावसाळ्यात लागलेली गळतीची समस्या आणि मुलभूत सोयी सुविधा अभावी या निवासाला अखेरची घरघर लागली आहे. येथे शौचालयाची सोय तर नाहीच शिवाय पाण्याचीही सोय नाही. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांची अवस्था ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशी झाली आहे.वीजघर (केंद्रे पुनर्वसन) येथील पोेलीस तपासणी नाका सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमारेषेवरील महत्वाचा तपासणी नाका आहे. या मार्गावरील अवैध वाहतूक, संशयास्पद मालाची वाहतूक, चोरट्या दारूची वाहतूक आदी गैरप्रकाराला आळा घालण्याचे काम यातून चांगल्या प्रकारे करण्यात आले. वरिष्ठांनी अनेकवेळा याबाबत स्तुती सुमनेही उधळली आहेत. त्यामुळे या नाक्याला पोलीस प्रशासनाला महत्वाचे स्थान आहे. पण या नाक्यावरच्या निवास खोलीची मात्र वाईट अवस्था झाली आहे. वीजघर येथील पोलीस चौकीच्या इमारतीतून पावसाळ्यात छपराच्या आतून चारी बाजूंनी पाणी पडत असल्याने त्यांची डोकेदुखी वाढत आहे. शिवाय येथे कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे सेवा बजावणाऱ्या पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या चौकीवरच्या कर्मचाऱ्यांसाठी शौचालयाची व्यवस्था नसल्याने हे कर्मचारी उघड्यावरच शौचास जातात. शिवाय येथे साधी पाण्याची सुद्धा सोय नाही. त्यामुळे उघड्यावर शौचास जातानाही पाण्याच्या शोध घेऊनच त्यांना जावे लागते. हे भीषण वास्तव असतानाही कुणीही वरीष्ठ अधिकारी या कर्मचाऱ्यांच्या आवश्यक सोयींसाठी प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.पावले उचलणे गरजेचेया चौकीचा परिसर दाट जंगलाचा असल्याने येथे दिवसाढवळ्याही वन्यप्राण्यांचा वावर असतो. त्यामुळे या चौकीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून तशी कार्यवाही आणि सुविधा निर्माण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पावले उचलण्याची गरज आहे. कर्मचाऱ्यांची कुचंबणाउघड्यावर शौचास जाताना एका बाजूने रोग पसरण्याचा धोका वाढतोच पण दुसऱ्या बाजूने चौकीच्या आसपासचा सर्व परिसर दाट जंगलाचा असल्याने कर्मचाऱ्यांच्या जीवितांच्यादृष्टीने वन्य प्राण्यांपासूनचा धोकाही संभवतो. आरोग्य विभागाच्या सुचनांचे पालन करणे आवश्यक असतानाही केवळ गरज म्हणून उघड्यावर शौचालयास जाणाऱ्या या कर्मचाऱ्यांची कुचंबना अजून किती दिवस प्रशासन पाहत राहणार आहे, असा सवाल ग्रामस्थांसह मार्गावरील वाहनधारकांतून होत आहे. तर या शासकीय कर्मचारीच अशा अस्वच्छ प्रसंगांना सामोरे जात असतील तर सर्वसामान्यांनी काय बोध घ्यावा? या प्रश्नाचेही उत्तरही प्रशासनाला द्यावे लागेल.