प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरण: नातेवाईकांच्या जबाबात मिलिंद माने यांचे नाव, माजी नगराध्यक्षाचे पती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 13:46 IST2025-07-10T13:44:22+5:302025-07-10T13:46:07+5:30

आजारी असल्याने रुग्णालयात दाखल

Police have arrested Milind Mane husband of former Devgad mayor Pranali Mane in connection with the suicide of Priya Chavan in Sawantwadi | प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरण: नातेवाईकांच्या जबाबात मिलिंद माने यांचे नाव, माजी नगराध्यक्षाचे पती

प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरण: नातेवाईकांच्या जबाबात मिलिंद माने यांचे नाव, माजी नगराध्यक्षाचे पती

सावंतवाडी: सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील प्रिया चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी देवगडच्या माजी नगराध्यक्ष प्रणाली माने यांच्या पती मिलिंद माने याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री उशिरा करण्यात आली. पोलिसांनी नोंदविलेल्या जबाबात माने याचे नाव निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई केली असल्याचे सांगितले गेले आहे.

मिलिंद माने याला ताब्यात घेण्यात आल्यावर त्याची रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्याला टायफॉईड तापाने आजारी असल्यामुळे अधिक उपचारासाठी येथेच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली. त्यांनी याशिवाय सांगितले की, माने याला ताब्यात घेतल्याची माहिती न्यायालयाला करण्यात आली आहे.

प्रिया चव्हाणने चार दिवसांपूर्वी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. या आत्महत्याप्रकरणी मृत प्रिया यांचे वडील विलास तावडे यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सुरुवातीला प्रणाली माने आणि त्यांचा मुलगा यांच्यासह दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना मंगळवारी येथे जिल्हा न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

तथापि, पोलिसांनी या प्रकरणात तिसऱ्या संशयिताला ताब्यात घेतले आहे, जो प्रणाली माने यांचा पती आहे. माने याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टायफॉईड तापामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात ठेवण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.

माने यांचे नाव तक्रारीत नव्हते, परंतु नातेवाइकांच्या जबाबात तसेच फोन सीडीआरवरून त्याचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग दिसून आल्यामुळे त्याला ताब्यात घेतले गेले आहे. मंगळवारी रात्री त्याला देवगड येथून ताब्यात घेतले गेले. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक माधुरी मुळिक करीत आहेत.

Web Title: Police have arrested Milind Mane husband of former Devgad mayor Pranali Mane in connection with the suicide of Priya Chavan in Sawantwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.