शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस वसाहतीची दुरवस्था

By admin | Updated: August 18, 2014 21:35 IST

खारेपाटणमधील समस्या : कर्मचाऱ्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न गंभीर

संतोष पाटणकर - खारेपाटण --रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या व पूर्वीच्या रत्नागिरी जिल्ह्यातील ब्रिटीशकालीन पोलीस वसाहत इमारतीची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. सध्या ही इमारत शेवटची घटका मोजत आहे. मात्र यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचा निवासाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.गेल्या दोन वर्षात खारेपाटण दशक्रोशीत लहान- मोठ्या चोरींच्या घटनेचे प्रकारदेखील वाढत आहेत. तसेच येथे स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, सिंधुदुर्ग मध्यवर्ती बँक, सहकारी सोसायटी, भालचंद्र नागरी सहकारी पतपेढी, महिला पतसंस्था आदी पत पुरविणाऱ्या संस्था, बँका असून गस्ती घालणाऱ्या पोलिसांचे पथक येथे कार्यरत असणे आवश्यक आहे. खारेपाटण ही ब्रिटीशकालीन बाजारपेठ असून इतिहासकालीन शहर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन पोलीस वसाहतीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.खारेपाटण शहरात हिंदू- मुस्लीम, जैन, बौद्ध, गुजराती आदी समाजबांधव सलोख्याने राहत असून खारेपाटणचे पूर्वीचे प्रथम पोलीस पाटील शंकर शेटये यांनी पोलिसांना नेहमीच सहकार्य केले. तोच वारसा पुढे चालवत सध्याचे पोलीस पाटील चंद्रकांत शेटये तंटामुक्ती समितीच्या साहाय्याने चांगल्याप्रकारे पार पाडत आहेत. नुकतीच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रानमोळे यांनी खारेपाटण पोलीस ठाण्याला भेट दिली होती. यावेळी ग्रामस्थांनी दक्षता कमिटी सभेमध्ये पोलीस वसाहतीबाबत माहिती दिली.मुख्य पोलीस ठाण्याची इमारत मात्र सुस्थितीत असून या इमारतीची दोनवेळा दुरूस्ती झाल्याचे समजते. ब्रिटीशकाळापासून खारेपाटण पोलीस ठाण्यामध्ये गणेश चतुर्थीत न चुकता गणपतीची मूर्ती बसवली जाते. पोलीस कर्मचारी भक्तीभावाने पूजाअर्चा करतात. गावाच्या गणपतीबरोबर याचे विसर्जन केले जाते, हे येथील वैशिष्ट्य आहे व ते आजपर्यंत टिकवून ठेवण्यात आले आहे.ऐतिहासीक ओळखपूर्वीच्या अखंड रत्नागिरी जिल्ह्यातील विजयदुर्ग बंदराला लागून असलेली पोलीस चौकी व पोलीस वसाहत म्हणून खारेपाटणची ओळख होती. ५ पोलीस, १ हवालदार, १ जमादार असे एकूण ७ पोलीस कर्मचारी या पोलीस वसाहतीमध्ये आपल्या कुटुंबासहीत राहत होते. बारा हजार लोकांमागे दोनच पोलीस कर्मचारीखारेपाटण पोलीस ठाणे क्षेत्रात खारेपाटण, चिंचवली, वायंगणी, शेर्पे, बेर्ले, कुरूंगावणे, नडगिवे, वारगाव, साळीस्ते, शिडवणे अशी एकूण १० गावे येत असून सुमारे १२००0 लोकसंख्येला फक्त २ पोलीस कर्मचारीच येथे कार्यरत आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस कर्मचाऱ्यांचे संख्याबळ कमी पडत आहे. सध्या जमादार मोहन रावराणे, हवालदार सदानंद कदम व पांडूरंग तुपसुंदर हे काम पाहत असून बऱ्याचवेळा प्रशासकीय कामानिमित्त त्यांना ३८ किलोमीटर असलेल्या कणकवली येथे पोलीस ठाण्यात जावे लागते. तर गुन्ह्यांचा तपास करणे, नोटीस बजावणे, चेक पोस्टला ड्युटी करणे आदी कारणांमुळे खारेपाटण पोलीस ठाण्यात कधी कधी कर्मचारीच नसल्याचे दिसते. तसेच रात्री- अपरात्री एखादा गुन्हा, भानगड घडल्यास पोलिसांना शोधत जावे लागते.