शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

हुंबरठ येथे कायमस्वरूपी चेकपोस्ट

By admin | Updated: August 11, 2015 23:34 IST

संजय साबळे : दारु पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी ७ आरामबस चालकांवर कारवाई

सिंधुदुर्गनगरी : प्रवासी वाहतूक करणारे आराम बसेसचे काही चालक दारु पिऊन वाहन चालवत असल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कणकवली तालुक्यातील हुंबरठ तिठा येथे कायमस्वरुपी चेकपोस्ट उभारण्यात आले असून गेल्या २० दिवसांत दारु पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी ७ आरामबस चालकांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय साबळे यांनी दिली. जिल्ह्यात किंवा अन्य ठिकाणी खासगी आरामबसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमालीची असते. काही बसेसचे चालक वाहने सुसाट चालवून काही तासातच मुंबईला पोहोचतात तर काही आराम बसेसचे चालक दारु पिऊन वाहन चालविल्यामुळे अपघात घडून त्यात निष्पाप प्रवाशांचे बळी जातात. ही बाब समोर आल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी जिल्ह्यात खासगी आराम बसेसच्या वाहनचालकांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कणकवली तालुक्यातील हुंबरठ येथे कायमस्वरुपी चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. या चेकपोस्टवर वाहतूक शाखेचे दोन व कणकवली पोलीस ठाण्याचे दोन असे एकूण चार कर्मचारी आहेत. रात्री ८ ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनचालकांची ब्रेथ अ‍ॅनालायझरमार्फत तपासणी करण्यात येत आहे. २१ आॅगस्टपासून स्थापन करण्यात आलेल्या चेकपोस्टवर अद्यापपर्यंत म्हणजेच गेल्या २० दिवसांत ७ आराम बसेसच्या वाहनचालकांवर दारु पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय साबळे यांनी दिली. दररोज ४० ते ५० आरामबसेसच्या दोन्ही वाहनचालकांची तपासणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांच्या मी नेहमीच विरोधात आहे. महामार्गावर असा प्रकार घडल्यास संबंधित वाहनचालकांवर कायदेशीर कारवाईही सुरुच राहणार आहे. - संजय साबळे, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूकमहिन्याभरात ६0 चालकांवर कारवाईजिल्ह्यात महिनाभरात दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांची कसून तपासणी वाहतूक पोलीस शाखेकडून करण्यात येत आहे. त्यानुसार इन्सुली येथे करण्यात आलेल्या तपासणीत १० लक्झरी बसेस चालक, आंबोली येथे १२ वाहनचालक आदी एकूण ६० वाहनचालकांवर दंडात्मक स्वरुपात कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय साबळे यांनी दिली.