शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
4
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
5
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
6
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
7
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
8
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
9
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
10
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
11
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
12
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
13
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
14
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
15
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
16
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
17
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
18
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
19
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
20
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
Daily Top 2Weekly Top 5

शांततेत चाललेले आंदोलन भडकवू नये.

By admin | Updated: December 25, 2014 00:13 IST

कमलताई परूळेकर : अंगणवाडी सेविकांना बजावलेली नोटीस मागे घेण्याची मागणीे

सिंधुदुर्गनगरी : मासिक प्रगती अहवाल दिला नाही म्हणून प्रशासनाने अंगणवाडी सेविकांना दिलेली कारणे दाखवा नोटीस प्रथम मागे घ्या. नंतरच अहवाल देण्याबाबतचा निर्णय घेऊ, असा इशारा देत शांततेत चाललेले आंदोलन सभापती स्नेहलता चोरगे यांनी भडकवू नये. त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा अंगणवाडी कर्मचारी सभेच्या नेत्या कमलताई परुळेकर यांनी दिला आहे.शासनाने मंजूर केलेले जादा मानधन मिळावे या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मासिक प्रगती अहवाल बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे ज्या तालुक्यांचे अहवाल आले नाहीत, अशा अंगणवाडी सेविकांना प्रशासनाने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. नुकत्याच पार पडलेल्या महिला व बालविकास समितीच्या बैठकीत सभापती स्नेहलता चोरगे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी प्रशासनास वेठीस धरून आंदोलन करू नये, अन्यथा कारवाई करावी, असे आदेश दिले होते. याबाबत कमलताई परुळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे खरपूस समाचार घेतला आहे. ज्यांच्यावर अन्याय होतो आणि ज्यांच्यामध्ये हिंमत असते तेच आंदोलन करतात. तेव्हा शांततेत चाललेले आंदोलन सभापती चोरगे यांनी भडकविण्याचा प्रयत्न करू नये. गेले सहा महिने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन मिळत नाही. प्रवास बिले तीन वर्षे प्रलंबित आहेत. आहाराची बिलेही रखडवून ठेवली जातात. याकडे समिती सदस्य असताना सभापती चोरगे यांनी लक्ष दिले असते, तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर आंदोलनाची वेळच आली नसती. (प्रतिनिधी)आंदोलन प्रशासनास जाग आणण्यासाठीअंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासन आणि शासन दुर्लक्ष करीत असल्याने त्यांचे लक्ष वेधण्यासाठी तसेच आजपर्यंतच्या अनुभवानुसार नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही, यासाठी मासिक प्रगती अहवाल बंद आंदोलन करावे लागले आहे. प्रशासनास वेठीस धरण्यासाठी आमचे आंदोलन नसून ते जाग आणण्यासाठी आहे. तेव्हा सभापती चोरगे यांनी आमचे आंदोलन भडकवू नये, असा इशारा कमलताई परुळेकर यांनी दिला आहे.