शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतीय महिलेच्या विनयभंगाची चर्चा?

By admin | Updated: February 28, 2016 00:02 IST

हेत पंचक्रोशीतील घटना : तीन दिवसांपूर्वी तक्रार; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ?

वैभववाडी : हेत पंचक्रोशीत परिसरातीलच तरुणाने परप्रांतीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली. त्याबाबत पीडित परप्रांतीय महिलेने तीन दिवसांपूर्वी भुईबावडा पोलीस दूरक्षेत्रात तक्रार दिली आहे. परंतु तक्रार देऊन तीन दिवस उलटले तरी पीडित महिला परप्रांतीय कामगार असल्याने पोलिसांनी संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंदवला नसल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. हेत परिसरात शासनामार्फत सुरु असलेल्या एका मोठ्या कामावर ती महिला कामगार असल्याचे समजते. त्याच परिसरातील तरुणाने त्या महिलेला रस्त्यावर अडवून विनयभंग केला. त्यादिवशी त्या महिलेने हा प्रकार कुटुंबियांना सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी भुईबावडा पोलीस दूरक्षेत्रात विनयभंगाची तक्रार दिल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. परंतु दूरक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्याने पीडित महिलेच्या तक्रारीनुसार विनयभंगाचा गुन्हा न नोंदवता संशयितास बोलावणे धाडले होते. कथित विनयभंग प्रकरणातील संशयित शुक्रवारी सकाळी दूरक्षेत्रात हजर न झाल्याने पोलीस दूरक्षेत्रातील अधिकारी दोनदा संशयिताच्या घरी जाऊन आले, अशी त्या गावात जोरात चर्चा सुरू आहे. तक्रारदार पीडित कामगार महिला परप्रांतीय असल्याने हे प्रकरण दडपण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न सुरु असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच तक्रार दाखल होऊन तीन दिवस उलटले तरी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकला नसल्याची कुजबूज ऐकायला मिळत आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत भुईबावडा पोलीस दूरक्षेत्रातील सहाय्यक उपनिरीक्षक एम. व्ही. चौकेकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्या महिलेची ‘शिविगाळी’ची तक्रार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पीडित महिला परप्रांतीय असल्याचा फायदा संशयिताला वाचविण्यासाठी उठवला जात असल्याची पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी) वैभववाडी पोलीस अनभिज्ञ..! ४हेत पंचक्रोशीतील कथित विनयभंगाच्या तक्रारीबाबत वैभववाडी पोलीस ठाण्यात चौकशी केली असता, गेल्या दोन तीन दिवसात तालुक्यात अशाप्रकारची महिलेची तक्रारच नसल्याचे सांगितले जाते. वैभववाडीपासून सुमारे २0 किमी अंतरावर भुईबावडा पोलीस दूरक्षेत्र आहे. दूरक्षेत्राचे कार्यक्षेत्र दुर्गम असल्याने वेगवेगळ्या प्रकारची कित्येक गंभीर प्रकरणे वैभववाडीपर्यंत न आणता दूरक्षेत्रातील पोलीस परस्पर दडपून टाकत असल्याची चर्चाही याप्रकरणाच्या निमित्ताने जोर धरू लागली आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देणार का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.