शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

पथकाच्या अहवालानंतर केंद्राकडे भरघोस पॅकेज मागणार : पंकजा मुंडे

By admin | Updated: August 13, 2015 00:25 IST

लातूर : केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने मराठवाड्यातील दुष्काळाची पाहणी केली आहे. आता हे पथक आपला अहवाल केंद्र शासनाला देईल.

लातूर : केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने मराठवाड्यातील दुष्काळाची पाहणी केली आहे. आता हे पथक आपला अहवाल केंद्र शासनाला देईल. आम्ही या पथकामार्फत केंद्र शासनाकडे मराठवाड्यातील दुष्काळाविरुद्धच्या लढाईसाठी भरघोस पॅकेजची मागणी करणार असल्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारी सांगितले. त्या पाहणी दौऱ्यात पत्रकारांशी बोलत होत्या. त्यांनी सुरुवातीला लातूर तालुक्यातील महापूर येथील बालाजी शिंदे यांच्या शेतात जळून गेलेल्या सोयाबीन पिकाची व किसन रणखांब यांच्या वाळलेल्या ऊसाची पाहणी केली. रेणापूर तालुक्यातील विश्वजित कदम यांची डाळींब बागही पाहून घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, मराठवाड्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. यासाठी केंद्रीय पथक पाहणी करीत आहे. या पथकाच्या अधिकाऱ्यांशी आम्ही दुष्काळाच्या स्थितीबाबत बैठक घेऊन चर्चाही केली. परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. या पथकाचा अहवाल केंद्राला गेल्यानंतर आम्हाला त्यांच्याकडून मोठ्या आशा आहेत. चारा आणि पाणी या दोन समस्या मोठ्या आहेत. त्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. चारा छावणीसंबंधीचा निर्णय झाला आहे, त्याची तातडीने अंमलबजावणीही होईल. आता शेतकऱ्यांना बळ देण्याची गरज आहे. यासाठी सरकार पुढाकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत जि.प.चे सीईओ दिनकर जगदाळे, एसडीओ प्रताप काळे, कृषी अधिकारी मोहन भिसे, तहसीलदार अजित कारंडे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)