डंपर अंगावरून गेल्याने अभियंत्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 12:05 IST2018-12-08T12:02:29+5:302018-12-08T12:05:55+5:30

मुंबई-गोवा महामार्ग चौपरीकरणाचे काम अहोरात्र सुरू आहे. कणकवली तालुक्यातील कासार्ड येथे केसीसी कंपनीच्या तरुण अभियंत्याचा डंपर अंगावरून गेल्याने  जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. 

one dead in road accident at sindhudurg | डंपर अंगावरून गेल्याने अभियंत्याचा मृत्यू

डंपर अंगावरून गेल्याने अभियंत्याचा मृत्यू

ठळक मुद्दे कणकवली तालुक्यातील कासार्ड येथे केसीसी कंपनीच्या अभियंत्याचा डंपर अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू.कासार्डे जांभुळवाडी येथे शनिवारी मध्यरात्री दीड वाजता ही घटना घडली. प्रानजूल प्रेमकुमार मिश्रा या तरुण अभियंत्याला जीव गमवावा लागला.

सिंधुदुर्ग :  मुंबई-गोवा महामार्ग चौपरीकरणाचे काम अहोरात्र सुरू आहे. कणकवली तालुक्यातील कासार्ड येथे केसीसी कंपनीच्या तरुण अभियंत्याचा डंपर अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. 

कासार्डे जांभुळवाडी येथे शनिवारी मध्यरात्री दीड वाजता ही घटना घडली. अपघातात उत्तर प्रदेशातील प्रानजूल प्रेमकुमार मिश्रा (24) या तरुण अभियंत्याला जीव गमवावा लागला. के.सी.सी कंपनीचे काम युद्धपातळीवर सुरू होते. डंपरचालकाला पाठीमागे अंदाज न आल्याने तरुण अभियंत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Web Title: one dead in road accident at sindhudurg