कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली पोलिसांनी थरारक पाठलाग करत गोवा बनावटीची अवैध दारूची वाहतूक करणारा आरोपी सचिन प्रभाकर वेलीप (३०, केवना, शिवना दक्षिण गोवा) याला रंगेहाथ ताब्यात घेऊन अटक केली आहे. यात १ लाख ४२ हजार ८० रुपयांची अवैध दारू व कारसह तब्बल ४ लाख ४२ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पहाटे २ वाजण्याच्या सुमारास केली.याबाबत अधिक माहिती अशी की, कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात यांना गोपनीय माहिती मिळाल्यानुसार, पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई- गोवा महामार्गावर पोलीस पथक सापळा रचून थांबले होते. त्यावेळी कार क्रमांक (जी. ए. ०९ डी २०२०) ही गोव्याहून चिपळूणच्या दिशेने जात असताना दिसून आली. तिला थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला.मात्र, आरोपीला पोलिसांचा सुगावा लागताच कार न थांबताच तळेरेच्या दिशेने वेगाने पळवली. त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, वाहतूक पोलीस संदेश आबीटकर, रुपेश गुरव यांनी कारचा थरारक पाठलाग करून तळेरे एसटी स्टँड येथे ही कार पकडली. यावेळी कारची तपासणी केली असता कारमध्ये तब्बल १ लाख ४२ हजार ८० रुपयांच्या गोवा बनावटीच्या हनी गाईड ब्रॅण्डच्या १ हजार ७७६ बाटल्या बॉक्समध्ये भरलेल्या आढळून आल्या. त्याच्याबरोबरच सुमारे ३ लाख रुपये किमतीची कारही पोलिसांनी जप्त केली आहे.धडक कारवाईबद्दल पोलिसांचे कौतुककणकवली पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारूच्या विरोधात केलेल्या या धडक कारवाईबद्दल पोलिसांचे कौतुक केले जात आहे. याबाबत वाहतूक पोलीस संदेश आबीटकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी सचिन वेलीपविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
पाठलाग करत पकडली दीड लाखांची दारू : आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 11:34 IST
liquor ban Sindhudurg police- कणकवली मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली पोलिसांनी थरारक पाठलाग करत गोवा बनावटीची अवैध दारूची वाहतूक करणारा आरोपी सचिन प्रभाकर वेलीप (३०, केवना, शिवना दक्षिण गोवा) याला रंगेहाथ ताब्यात घेऊन अटक केली आहे. यात १ लाख ४२ हजार ८० रुपयांची अवैध दारू व कारसह तब्बल ४ लाख ४२ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पहाटे २ वाजण्याच्या सुमारास केली.
पाठलाग करत पकडली दीड लाखांची दारू : आरोपीस अटक
ठळक मुद्देपाठलाग करत पकडली दीड लाखांची दारू : आरोपीस अटक पहाटे २ वाजता केली पोलिसांनी कारवाई