शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

कणकवली तहसिल कार्यालयावर नितेश राणेंची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 11:41 IST

कणकवली तहसिल कार्यालयात ४२४ दाखले प्रलंबित असल्याने महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचण निर्माण झाली असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांना मिळाली. त्यामुळे या समस्येची तत्काळ दखल घेत त्यांनी सोमवारी आपल्या सहकाऱ्यांसमवेत येथील तहसिल कार्यालयावर धडक दिली.

ठळक मुद्देतहसिलदारांसह कर्मचाऱ्यांना धरले धारेवरदाखले व अन्य कामे तातडीने मार्गी लावण्याची सूचना

कणकवली: कणकवली तहसिल कार्यालयात ४२४ दाखले प्रलंबित असल्याने महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचण निर्माण झाली असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांना मिळाली. त्यामुळे या समस्येची तत्काळ दखल घेत त्यांनी सोमवारी आपल्या सहकाऱ्यांसमवेत येथील तहसिल कार्यालयावर धडक दिली.तहसिल कार्यालयातील महसुल शाखा, दुय्यम निबंधक कार्यालय आणि प्रांत कार्यालयातील सर्व विभागाना भेट देत कर्मचाऱ्यांकडून कामातील समस्या जाणून घेतल्या. तसेच कार्यपध्द्तीत तत्काळ बदल करून जनतेला चांगल्या सुविधा द्या असे तहसिलदार व अधिकाऱ्यांना ठणकावले. ४२४ एवढे दाखले प्रलंबित का राहिले? असा जाबही विचारला. जोपर्यंत जनतेची कामे मार्गी लागत नाहीत तोपर्यंत कार्यालयात आपण ठाण मांडणार असा इशारा देताच अवघ्या दोन तासात ६३ दाखले निकाली काढण्यात आले.कणकवली तहसिल कार्यालयात आमदार नितेश राणे यांनी तहसिलदार संजय पावसकर यांची भेट घेतली. यावेळी नायब तहसिलदार आर. जे. पवार, रवींद्र कडुलकर आदी अधिकारी उपस्थित होते. तसेच स्वाभिमान पक्षाचे शहराध्यक्ष राकेश राणे, युवक जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, उपाध्यक्ष सोनू सावंत, माजी उपसभापती महेश गुरव, पंचायत समिती सदस्य मनोज रावराणे, मिलींद मेस्त्री, महेश लाड, स्वप्नील चिंदरकर, कान्हा मालंडकर, माजी नगरसेवक अण्णा कोदे, संजय नकाशे, संतोष कानडे, भालचंद्र साटम, राकेश परब , उत्तम सावंत आदी स्वाभिमान पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.प्रलंबित दाखल्यांबाबत तहसिलदार संजय पावसकर यांना विचारणा केली असता त्यांनी आज दाखले होतील, असे उत्तर दिले. त्यावेळी आमदारांनी त्याच टेबलवर चला, बघुया दाखले का पेंडींग आहेत ते़ ? असे सांगितले. त्या ठिकाणी चौकशी केली असता ४२४ दाखले प्रलंबीत असल्याचे दिसले.आमदार राणे यांनी दाखले का प्रलंबीत ठेवलात? सकाळपासून किती दाखले केलात? प्रलंबीत कामे ठेवून जनतेला त्रास का देता? अशी विचारणा कर्मचाऱ्यांना केली. त्यावेळी इंटरनेट व सर्व्हर डाऊन असल्याने अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. तिथेच उभे राहून नितेश राणे यांनी कामाचा आढावा घेतला. त्यावेळी इंटरनेटला चांगला 'स्पीड ' असल्याचे दिसून आले. त्यावेळी तहसिलदारांना आता इंटरनेटचा स्पीड चांगला आहे, चार माणसे बसवा आणि दाखल्यांचे काम मार्गी लावा, असे नितेश राणे यांनी सांगितले. त्यानंतर अवघ्या दोन तासात तब्बल ६३ दाखले निकाली निघाल्याने आमदार येताच आता कसा स्पीड मिळाला अशी कोपरखळी तहसिदारांना आ़मदार राणे यांनी मारली .यावेळी वीज प्रवाह खंडीत झाल्याने वीज वितरणचे सहाय्यक कार्यकारी अभियंता भगत याना तहसिल कार्यालयात बोलविण्यात आले. त्यांना आमदार राणे यांनी तहसिल कार्यालयाला वेगळ्या फीडरवरून वीज पुरवठा करा. कारण हजारो लोकांची कामे तहसिल कार्यालयाशी निगडीत आहेत. वीज गेल्यास सर्व सेवा ठप्प होतात. या फिडरवरील काम सकाळी १० पूर्वी किंवा संध्याकाळी ७ नंतर करावे. तहसिलदार यांच्याशी चर्चा करून वीजेचा प्रश्न मार्गी लावा. नागरीकांची गैरसोय करून नका . अशा सूचना दिल्या.दुय्यम निबंधक कार्यालयातील लिपीक धारेवर !कणकवली दुय्यम निबंधक कार्यालयाअंतर्गत चाललेले कामकाज जनतेसाठी त्रासदायक असल्याची बाब स्वाभिमान कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या लक्षात आणून दिली. यावेळी कासार्डे येथील संजय नकाशे यांनी दुय्यक निबंधक कार्यालयातील घाडीगांवकर हा लिपीक अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन जनतेला त्रास देतो. जिल्हा परिषद शाळेच्या बक्षीस पत्रासाठी ८० वर्षाच्या वृध्देला इंटरनेट नसल्याने आॅफलाईन काम न करता दिवसभर बसवून परत पाठविले. शासनाचा जीआर आॅफलाईन काम करण्याचा असतानादेखील हा लिपीक जाणीवपुर्वक त्रास देत असल्याचे सांगितले. यावेळी आमदार राणे यांनी तुमच्या कामात बदल करा असे सांगत त्या लिपीकाला समज दिली.स्टॅम्प विक्रेत्यांना आमदारांचा इशारा !तहसील कार्यालयातील स्टॅम्प विक्रेत्यांकडून स्टॅम्प दिले जात नाहीत. अशी तक्रार आमदारांकडे काही नागरिकांनी केली. त्यामुळे त्यांनी तिथे पाहणी केली असता एकाच स्टॅम्प विक्रेत्याकडे गर्दी दिसून आली. त्या स्टॅम्प विक्रेत्याला आमदारानी समज दिली. तसेच स्टॅम्प विक्रीच्या मुद्यावर दुय्यम निबंधक जाधव यांनाही विचारणा केली. नागरिकांना दोन-दोन तास स्टॅम्प घेण्यासाठी थांबावे लागते, तुमचा लक्ष आहे काय? तहसिलदार काय करता तुम्ही? अशी विचारणा केली. तसेच विक्रेत्यांकडून दररोज आढावा घ्या. एकाच विक्रेत्याने स्टॅम्प न देता सर्वांनी द्यावे. नागरीकांची गैरसोय होता नये. पुन्हा तक्रार आल्यास खपवून घेतले जाणार नाही. असे सांगितले.प्रतिज्ञापत्र २० मिनिटात दिलेच पाहिजे !नागरीकांना दोन-दोन तास प्रतिज्ञापत्रासाठी थांबावे लागल्यास बाहेरून येणाऱ्या लोकांनी करायचे काय? सेतू कार्यालयात प्रतिज्ञापत्र दाखल झाल्यापासून अवघ्या वीस मिनिटात संबंधित अधिकाऱ्याची सही होऊन नागरीकांना प्रतिज्ञापत्र दिले जावे . कुठलाही हलगर्जीपणा चालणार नाही. प्रतिज्ञापत्रामध्ये नागरीक आपली हमी देत असतात. त्यामुळे त्यात त्रुटी काढून जनतेला त्रास देऊ नका. पुढील काळात मी या सेवांचा आढावा घेणार असल्याचे आमदार राणे यांनी सांगितले.प्रांत कार्यालयाला भेट !कणकवली प्रांताधिकारी कार्यालयाला आमदार राणे यानी भेट दिली असता २१५ दाखले अधिकाऱ्यांच्या सहीसाठी प्रलंबित असल्याची बाब उघड झाली. तसेच वैभववाडीतील अंध असलेले दिलीप नारकर व अन्य नागरीकांनी प्रांत कार्यालयातील प्रलंबीत दाखल्यांबाबत तक्रारी केल्या़. त्याबाबत चौकशी केली असता कर्मचाऱ्यांनी इंटरनेट सेवेचे कारण पुढे केले. आमदार राणे यांनी कोणतीही सबब सांगून चालणार नाही. विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्याचा प्रश्न आहे. कोणत्याही परिस्थितीत दाखल्यांचा निपटारा करा, अशा सूचना नायब तहसिलदार आर. जे. पवार व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. 

टॅग्स :TahasildarतहसीलदारNitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग