Sindhudurg Crime: चारित्र्याच्या संशयावरून नेपाळी कामगाराने केली पत्नीची हत्या, खून केल्याची स्वत:च दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 11:59 IST2025-08-28T11:56:54+5:302025-08-28T11:59:44+5:30

लाकडी दांड्याने पत्नीवर हल्ला करून तिचा खून केला

Nepali worker kills wife over suspicion of character in Devgad Naad Sindhudurg | Sindhudurg Crime: चारित्र्याच्या संशयावरून नेपाळी कामगाराने केली पत्नीची हत्या, खून केल्याची स्वत:च दिली माहिती

Sindhudurg Crime: चारित्र्याच्या संशयावरून नेपाळी कामगाराने केली पत्नीची हत्या, खून केल्याची स्वत:च दिली माहिती

देवगड : देवगड तालुक्यातील नाद येथे एका नेपाळी कामगाराने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. आरोपीचे नाव प्रेम बहादूर बिष्ट (वय ३८, मूळ रा. नेपाळ, सध्या रा. बेब्याचा सडा, नाद) असून, देवगड पोलिसांनी त्याला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले. गणेशोत्सवाच्या काळात घडलेल्या या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

नाद येथील बागायतदार यशवंत रमेश सावंत यांच्या 'बेब्याचा सडा' येथील कलम बागेत आरोपी आणि त्याची पत्नी मजुरीसाठी काम करत होते. दि. २६ ऑगस्ट रोजी रात्री त्यांच्यात वाद झाला. यात आरोपीने लाकडी दांड्याने पत्नीवर हल्ला करून तिचा खून केला.

खून केल्याची स्वत:च दिली माहिती

आरोपीने स्वतः बागेचे मॅनेजर मोहन मोरे यांना फोन करून घटनेची माहिती दिली. ते घटनास्थळी गेले असता पत्नी मृत आढळली. त्यानंतर पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली. देवगड पोलिस ठाण्यात गुन्हा खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Web Title: Nepali worker kills wife over suspicion of character in Devgad Naad Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.