शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
5
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
6
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
7
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
8
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
9
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
10
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
11
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
12
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
13
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
14
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
15
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
16
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
17
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
18
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
19
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
20
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

महेंद्र शिंदेंसारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची गरज

By admin | Updated: August 26, 2015 22:52 IST

अशोक करंबेळकर : आचरा येथे सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा वर्षपूर्तीनिमित्त कार्यक्रम

आचरा : भारताला आर्थिक महासत्ता बनविताना वारंवार होणारे दहशतवादी हल्ले आणि अतिरेकी कारवाया या दिवसेंदिवस उग्र स्वरूप धारण करीत असताना महेंद्र शिंदे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर अधिकाऱ्यांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन अशोक करंबेळकर यांनी व्यक्त केले. आचरा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून वर्षभरापूर्वी कार्यभार स्वीकारलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांनी वर्षभरात आचरा गावातच नव्हे तर पंचक्रोशीमधील आपल्या पोलीस ठाणे हद्दीमध्ये आपल्या अनोख्या कार्याचा ठसा उमटविताना आपल्या दैनंदिन कामकाजाबरोबरच आपल्या कार्याच्या परिघाबाहेर जनमानसामध्ये मिळून मिसळून काम करताना अनेक लोकोपयोगी कार्य केली आहेत. या सर्व कार्यामुळे आचरा पंचक्रोशीमध्ये पोलीस दलाची शान वाढविण्यात त्यांनी अनोखे यश संपादन केल्यामुळे आचरा पत्रकार मित्रांनी त्यांच्या वर्षपूर्ती सोहळ्याचे आयोजन श्री देव रामेश्वर संस्थानच्या भक्तनिवास सभागृहात केले होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरपिता लेफ्टनंट कर्नल मनिष कदम यांचे वडील शशिकांत कदम तर व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, बाळासाहेब पंतवालावलकर, रामेश्वर देवस्थानचे सचिव संतोष मिराशी, शशांक मिराशी आदी मान्यवर उपस्थित होते.आचरा पत्रकार मित्रांच्यावतीने त्यांचा मानपत्र, श्रीफळ व भेटवस्तू देऊन शशिकांत कदम यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कोकण माऊली रिसॉर्टच्यावतीने चित्रकार विशाल गोलतकर यांच्यावतीने त्यांनी चितारलेली महेंद्र शिंदे यांची अनोखी छबी त्यांना भेट म्हणून दिली.यावेळी उपस्थित मान्यवरांमधून आपल्या जीवनाला अनोखी दिशा प्राप्त करून दिल्याची आठवण सांगताना आपल्याला महेंद्र शिंदे यांच्यामुळे पुनर्जन्म मिळाल्याचे काही दिवसांपूर्वी मनोरुग्ण म्हणून वावरणाऱ्या मनिष पाटील याने सांगितले. तर तरुणाईला वाममार्गाकडे जाण्यापासून परावृत्त करणाऱ्या महेंद्र शिंदे यांचे कार्य अर्चन पांगे याने आपल्या स्व अनुभवातून कथन केले. ज्येष्ठ नागरिकांसोबत मित्रभावनेने वावरणाऱ्या शिंदे यांची ओळख अशोक गावकर व श्रीकांत सांबारी यांनी करुन दिली. एक कर्तव्यदक्ष अधिकारी कसा असतो याचे उदाहरण माजी सभापती निलिमा सावंत यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले. गावपळण कालावधीत शिंदे यांचे अनोखे कार्य अनिल करंजे यांनी विषद केले. शशांक मिराशी यांनी महेंद्र शिंदे हे आचरावासियांचे मित्रच बनल्याचे सांगताना त्यांच्यामधील माणूस सदोदीत जागा असल्याचे सांगितले. अशोक करंबेळकर यांनी महेंद्र शिंदे यांच्या चांगल्या कार्याची दखल तर घेतलीच पण आचरा हे सागरी पोलीस ठाणे असल्याने आचरा सागरी पोलीस ठाण्यामार्फत खरोखर अभिप्रेत असलेले कार्य करण्याकरीता महेंद्र शिंदे यांनी आपल्या वरिष्ठांकडे तशा स्वरूपाचा पाठपुरावा करण्याची सूचना केली. शेवटी या कार्यक्रमास उपस्थित संतोष कोदे, समीर हडकर, सचिन हडकर, अभय भोसले, राजन गावकर आदींनी भेटवस्तू देऊन शिंदे यांचा गौरव केला.महेंद्र शिंदे आपल्या सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, फारसे काही वेगळे केले नाही तर माझ्या कर्तव्यामध्ये कार्य करताना थोडेसे अधिक काही समाजाकरीता द्यावे असे वाटल्याने मी ते करत गेलो आणि पुढेही करतच राहीन. मी आचरा गावचा सुपत्र या भावनेने या ठिकाणी कार्यरत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सानेगुरुजी कथामालेचे सुरेश ठाकूर यांनी केले तर सूत्रसंचालन रामचंद्र कुबल यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी यशराज संघटना आचराचे कार्यकर्ते जयप्रकाश परुळेकर, बागवे लंच होमचे आशिष बागवे आदींनी सहकार्य केले. (वार्ताहर)