शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

'राणेंना कधीही भाजपात प्रवेश मिळणार नाही', राज्यमंत्र्याचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 10:49 PM

आमदार नितेश राणे यांनी राणेंच्या भाजपा प्रवेशाला दुजोरा दिलाय. चर्चगेटच्या गरवारे हॉलमध्ये 2 ऑक्टोबरला सायंकाळी 4 वाजता राणेंचा भाजपामध्ये पक्षप्रवेश होणार

वेंगुर्ले : आपल्या मुलांच्या भविष्यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजपात जाण्याच्या तारखा देत आहेत. परंतु, काही झाले तरी त्यांना भाजपात प्रवेश मिळणार नाही असा दावा राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते  नारायण राणे हे 2 ऑक्टोबरला भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या आहेत.

आमदार नितेश राणे यांनी राणेंच्या भाजपा प्रवेशाला दुजोरा दिलाय. चर्चगेटच्या गरवारे हॉलमध्ये 2 ऑक्टोबरला सायंकाळी 4 वाजता राणेंचा भाजपामध्ये पक्षप्रवेश होणार असून, त्यानंतर ते महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही भाजपामध्ये विलीन करणार आहेत. मात्र, शिवसेना नेते आणि राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी नारायण राणेंच्या प्रवेशाचा दावा खोटा ठरला आहे. तसेच, राणेंना भाजपात कधीही प्रवेश मिळणार नाही, असेही केसरकर यांनी म्हटलंय.  तर, सिंधुदुर्गमधील जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत हे आज खऱ्या अर्थाने राणे यांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्याची टिकाही मंत्री केसरकर त्यांनी केली. दरम्यान, सतिश सावंत यांनी स्वाभिमान पक्षाला सोडणार असल्याचे घोषित आहे. त्यावरुन, केसरकर यांनी राणेंना लक्ष्य केलं.  

दरम्यान, मी भाजपामध्ये स्वतःहून प्रवेश करण्यास जात नसून त्यांनी मला बोलावलं आहे, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात केला होता. पुढे ते म्हणाले होते की, माझा भाजप प्रवेश आणि मंत्रिपदही ठरले होते. मात्र शिवसेनेला मी नको असल्याने त्यांनी आडकाठी आणली. त्यांना माझी भीती वाटते. मात्र मी जाणार हे पक्के असल्याचेही स्पष्ट संकेत त्यावेळी राणेंनी दिले होते. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे BJPभाजपाDeepak Kesarkarदीपक केसरकर Shiv Senaशिवसेना