शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवासाठी रत्नागिरीतून जादा गाड्या

By admin | Updated: July 25, 2014 22:50 IST

२४ आॅगस्टपासून या गाड्या सोडण्यात येणार

रत्नागिरी : कोकणामध्ये गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत असल्यामुळे मुंबईकरांच्या सोयीसाठी रत्नागिरी विभागाकडून ७५ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. २४ आॅगस्टपासून या गाड्या सोडण्यात येणार आहेत.गणेशोत्सवासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने गावाकडे परततात. कोकण रेल्वेच्या गाड्यांचे आरक्षण आधीच फुल्ल झाले आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या सोयीसाठी रत्नागिरी विभागाने जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. विभागातील नऊ आगारातून एकूण ७५ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. दापोली आगारातून मुंबई, बोरिवली, ठाणे, भार्इंदर, कल्याण, नालासोपारा मार्गावर सात जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. खेड आगारातून बोरिवली, मुंबई, भांडुप, कल्याण, ठाणे, पुणे मार्गावर दहा जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. चिपळूण आगारातून मुंबई, स्वारगेट, पुणे, चिंचवड, बोरिवली मार्गावर आठ, तर गुहागर आगारातून मुुंबई, बोरिवली, भांडुप, परेल, ठाणे, विरार, विठ्ठलवाडी मार्गावर अकरा जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. देवरुख आगारातून बोरिवली, मुंबई, स्वारगेट मार्गावर आठ, तर रत्नागिरी आगारातून बोरिवली, मुंबई, पुणे मार्गावर पाच, लांजा आगारातून सहा जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. राजापूर आगारातून बोरिवली, नालासोपारा, मार्गावर दहा, तर मंडणगड आगारातून मुंबई, बोरिवली, नालासोपारा, भार्इंदर, परळ मार्गावर पाच जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. एकूण रत्नागिरी विभागातून ७५ गाड्या मुंबईत सोडण्यात येणार आहेत. तेथून मुंबईकरांना घेऊन या गाड्या प्रत्येक आगारामध्ये व जवळच्या ग्रामीण भागात दाखल होणार आहेत. राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे आॅनलाईन आरक्षण सुविधा सुरु आहे. याशिवाय ग्रुप बुकिंगदेखील करण्यात येत आहे. येणाऱ्या गाड्यांचे नियोजन २४ ते २९ आॅगस्टपर्यंत करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)