शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मोड यात्रेने ‘आंगणेवाडी’ची सांगता

By admin | Updated: February 27, 2016 01:21 IST

दहा लाख भाविकांनी घेतले दर्शन : भाविकांचा दर्शनासाठी ओघ

मालवण : आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीच्या महायात्रेची लाखो भाविकांच्या साक्षीने उत्साहात सांगता झाली. दीड दिवस सुरू असलेल्या यात्रोत्सवाची सांगता शुक्रवारी सायंकाळी मोडयात्रेने झाली. दीड दिवसात १० लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतल्याचे आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाच्यावतीने सांगण्यात आले. तर यानिमित्ताने करोडो रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री ८ वाजल्यापासून देवीला प्रसाद लावण्याचा सोहळा भाविकांनी नयनात साठवून ठेवला. देवीच्या मानकऱ्यांची प्रसादाची ताटे सुहासिनी महिलांनी डोक्यावर घेत आणली. त्यानंतर ग्रामस्थांनी घरात बनविलेली प्रसादाची ताटे देवालयात आणण्यात आली. यावेळी मंदिर परिसरात भाविकांची एकच गर्दी पहावयास मिळाली. दुसऱ्या दिवशीही सकाळपासून भाविकांच्या दर्शनाच्या रांगा भरलेल्या होत्या. मोड यात्रेच्या शेवटच्या टप्प्यातही हजारो भाविकांनी दर्शन घेतले. अनुचित प्रकार नाही आंगणेवाडी यात्रोत्सवात ग्रामस्थ मंडळाने पोलीस प्रशासनाला धरून केलेल्या सुयोग्य नियोजनामुळे दीड दिवसांच्या यात्रोत्सवात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मजा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवल्याने तसेच सीसीटीव्ही यंत्रणेचा मोठा वापर केल्याने यात्रोत्सव सुरळीत पार पाडण्यास यंत्रणा यशस्वी ठरली. दुसऱ्या दिवशीही महनीय व्यक्तींची उपस्थिती आंगणेवाडी भराडी देवीच्या दीड दिवसाच्या यात्रोत्सवात दुसऱ्या दिवशीही महनीय व्यक्तींनी देवीचे दर्शन घेतले. यात भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार सुभाष चव्हाण, आदींनी हजेरी लावली. मोड यात्रेदिवशीही हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. सायंकाळी उशिरा मोड यात्रेची उत्साहात सांगता झाली असली तरी जिल्ह्यात काँग्रेसने दिलेल्या रास्तारोको आंदोलनाचा इशारा लक्षात घेता पोलीस बंदोबस्त लवकर आटोपता घेण्यात आला होता.