शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प यांची अचानक उदारता कशासाठी?
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
4
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
5
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
6
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
7
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
10
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
11
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
12
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
13
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
14
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
15
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
16
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
17
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
18
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
19
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
20
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ वादातूृन मित्राचा निर्घृण खून

By admin | Updated: October 3, 2015 22:54 IST

तळवली येथील घटना : संशयितास तत्काळ अटक

गुहागर : दोघा मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून मुकेश गोविंद पवार (वय २५, रा. तळवली) याचा धारदार हत्याराने खून झाल्याची घटना गुहागर तालुक्यातील तळवली बागकर स्टॉप येथे शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी मुकेशचा मित्र समीर ऊर्फ लाडू विनायक पवार (२६, तळवली, बौद्धवाडी) याला गुहागर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ७ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुकेश आणि समीर यांची गेली अनेक वर्षे मैत्री होती. मुकेश ग्लोबल ट्रॅव्हल्सच्या बसवर क्लिनर म्हणून काम करीत होता, तर समीर गावातच वाहनचालक म्हणून काम करतो. शुक्रवारी घटनेच्या दोन तास आधी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये किरकोळ वाद झाला होता. या वादातून मुकेशने समीरच्या कानाखाली मारले होते. सायंकाळी जोरदार पाऊस पडू लागला होता. रात्री ८.३० वाजता विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू होता. बाजारपेठेतील दुकानेही बंद करण्यात आली होती. यादरम्यान काळोखाचा फायदा घेत समीरने मुकेशच्या मानेवर धारदार सुऱ्याने वार केला. त्याच अवस्थेत मुकेश दहा-पंधरा पावले पळत ‘मला वाचवा, डॉक्टरकडे न्या’ असे ओरडत समोर येऊन कोसळला. काही दुकानदार व नागरिकांनी हे पाहिल्यानंतर पोलीसपाटील विनोद पवार तसेच गुहागर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक विनित चौधरी, अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. या घटनेनंतर समीर पवार घरी गेला. घराबाहेर असलेल्या वाळूच्या ढिगाऱ्यात सुरा लपवून ठेवला आणि रक्ताने माखलेले कपडे टपात पाणी घेऊन साफ केले. यानंतर काही घडलेच नाही, अशा आविर्भावात तो झोपला. घटनेचा माग घेत रात्रीच गुहागर पोलीस त्याच्या घरी पोहोचले आणि समीरला ताब्यात घेतले. समीरने आपला गुन्हा कबूल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शनिवारी सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गावडे हेही घटनास्थळी पोहोचले. विच्छेदनानंतर मुकेशचा मृतदेह शनिवारी नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. पोलीस निरीक्षक विनित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. (वार्ताहर)