शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प यांची अचानक उदारता कशासाठी?
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
4
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
5
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
6
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
7
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
10
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
11
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
12
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
13
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
14
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
15
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
16
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
17
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
18
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
19
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
20
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
Daily Top 2Weekly Top 5

गुहागरात मसापचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन

By admin | Updated: September 24, 2014 00:08 IST

निमित्त वर्धापन दिनाचे : नवोदिता लेखकांसाठी ठरणार पर्वणी

असगोली : मराठी भाषा व साहित्य यांची सर्वांगीण प्रगती आणि विकासासाठी कार्यरत असणाऱ्या तसेच मराठी कवी व साहित्यिकांच्या हितासाठी अहोरात्र झटणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या गुहागर शाखेच्या वतीने वर्धापन दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.दि. २९ व ३० नोव्हेंबर रोजी भंडारी भवन, गुहागर येथे होणाऱ्या या साहित्य संमेलनातून गुहागरातील साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीला अधिकाधिक चालना देण्याचा संयोजकांचा मानस आहे. त्याच धर्तीवर या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर गुहागर बाजारपेठेत होणार आहे.जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक व कवी प्रा. अशोक बागवे (मुंबई), कवी इंद्रजीत भालेराव (परभणी), भास्कर बढे (बीड), श्रीराम दुर्गे (चिपळूण), दादा मडकईकर (सिंधुदुर्ग) कवी राष्ट्रपाल सावंत (चिपळूण), कैलास गांधी (दापोली) अनेक प्रख्यात साहित्यिकांचा सहभाग लाभणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनात पर्यावरण व ग्रंथदिंडी, शोभायात्रा, उद्घाटन सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रम, लोककलांचे लोककलावंतांकडून सादरीकरण व त्यांचा सन्मान, परिसंवाद, कथाकथन, ग्रंथप्रदर्शन आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक - युवतींसाठी शिक्षक व साहित्य प्रेमींसाठी विशेष कार्यक्रमांचा भर असणार आहे.संमेलन गुहागरचा मानबिंदू ठरावा, यासाठी संयोजन समिती प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले. यात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, गुहागरचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर, उपाध्यक्ष बाबासाहेब राशिनकर, प्रा. मनाली बावधनकर, कार्यवाह ईश्वरचंद्र हलगरे, सहकार्यवाह ज्ञानेश्वर झगडे, खजिनदार प्रा. महावीर थरकार, कार्यकारी सदस्य संजय गमरे, सल्लागार अ‍ॅड. संकेत साळवी यांनी केले आहे. (वार्ताहर)महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संमेलनामुळे गुहागर येथील साहित्य चळवळीला उजाळा मिळणार.संमेलन यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांचे गठन.नामवंत कवींचा सहभाग.तयारीला लागले गुहागरकर.विद्यार्थी, युवावर्गासाठी विशेष कार्यक्रम.