शहरं
Join us  
Trending Stories
1
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
2
"मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
3
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
4
“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका
5
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
6
४ दिवसांत ४ लाख भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन; राम मंदिराला दिले दीड कोटींचे दान
7
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
8
पोर्शे कार अपघात प्रकरणावर मुनव्वर फारुकीचं ट्वीट; म्हणाला, "मी १७ वर्षांचा असताना..."
9
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!
10
Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल
11
Life Lesson: जर तुम्ही चाळीशीच्या उंबरठ्यावर असाल तर पुढील चाळीस वर्षांसाठी बळ देणारी ही गोष्ट वाचा!!
12
"...नाहीतर मलाच जेलमध्ये घालतील"; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोर्शे कार अपघातावर संतप्त प्रतिक्रिया
13
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
14
"तिला पाहिल्यावर डोळ्यात पाणी येतं", मनिषा कोईरालाबरोबरच्या ब्रेकअपनंतर दु:खी झाले होते नाना
15
₹१६७ कोटींची सॅलरी! Wipro मध्ये सर्वाधिक वेतन कोणाला मिळालं, रिशद प्रेमजी नाही तर कोण?
16
आयुष्यात पहिलीच कार खरेदी करताय; कशी निवडावी? अनेकांकडून कॉमन चुका हमखास होतात
17
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळं मिटेल"; 'बाळा'च्या आजोबांसोबत आलेल्या व्यक्तीची पोलीस आयुक्तालयातच मुजोरी
18
स्टेडियममध्ये चाहत्यांचा कहर! सेल्फीसाठी जान्हवीच्या दिशेने फेकले मोबाईल, Video व्हायरल
19
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
20
Tarot Card: येत्या आठवड्यात आव्हानं अनेक आहेत, पण चिंतन करा, चिंता नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

मालवणच्या स्कुबा ड्रायव्हर्सनी रत्नागिरीतील समुद्रात बुडालेले ट्रॉलर्स काढले वर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 5:12 PM

संदीप बोडवे मालवण: रत्नागिरी येथे खोल समुद्रात बुडालेले दोन मासेमारी ट्रॉलर समुद्रा बाहेर काढण्यात मालवण येथील स्कुबा ड्रायव्हर्सना यश ...

संदीप बोडवेमालवण: रत्नागिरी येथे खोल समुद्रात बुडालेले दोन मासेमारी ट्रॉलर समुद्रा बाहेर काढण्यात मालवण येथील स्कुबा ड्रायव्हर्सना यश आले आहे. बुडालेल्या दोन्ही ट्रॉलर्स सोबत असलेलें भले मोठे जाळे वेगळे करणे अतिशय जोखमीचे काम होते. या स्कुबा ड्रायव्हर्सनी आपले पाण्यातील कसब पणाला लावत समुद्रात बुडालेले जाळे आणि ट्रॉलर्स मालकांना परत मिळवून दिले आहे. पाण्याचा प्रवाह आणि अतिशय कमी दृश्यमानतेत ही कामगिरी बजावल्या बद्दल मालवण येथील स्कुबा डायव्हिंग पथकाचे मच्छिमारांकडून मोठे कौतुक होत आहे. 

पंधरा दिवसात बुडाले दोन ट्रॉलर्स..रत्नागिरी मिरकरवाडा येथील जुबेर खान यांच्या मालकीचा सी लाईन हा ट्रॉलर्स ३० वाव खोल समुद्रात तर मंगळवारी जयगड समुद्रात दुसरा ट्रॉलर्स बुडाल्याची घटना घडली होती. किमती जाळ्या सह पंधरा दिवसात रत्नागिरी येथे दोन ट्रॉलर्स समुद्रात बुडाले होते. यात दोन्ही ट्रॉलर्स मालकांचे मोठे नुकसान झाले. 

मालवण येथील स्कुबा डायव्हर्स आले धावून..रत्नागिरी येथे खोल समुद्रात ट्रॉलर्स बुडाल्याची माहिती मिळताच किनारपट्टीवर धावाधाव झाली. दोन्ही वेळी हे ट्रॉलर्स समुद्रा बाहेर काढण्यासाठी मालवण येथील स्कुबा डायव्हर्सना पाचारण करण्यात आले. 

जाळे सोडवून ट्रॉलर्स बाहेर काढण्यात यश..बुडालेल्या ट्रॉलर्स सोबत असलेले जाळे समुद्राच्या पाण्यात जावून सोडविणे मोठे जिकिरीचे काम होते. सुमारे ६० फूट खोल समुद्रात उतरत जाळे आणि ट्रॉलर्स वेगळे करताना पाण्याचा प्रवाह आणि कमी दृष्यमानतेचा आम्हाला सतत सामना करावा लागला, असे या पथकातील स्कुबा डायमास्टर असलेले समिर गोवेकर म्हणाले. समुद्रातील दोंन्ही मोहिमांमध्ये सतत दोन ,दोन दिवस समुद्रात राहिल्यामुळे आमची त्वचा खराब झाली. तसेच यावेळी समुद्रातील जेलिफिश आणि अन्य धोके स्वीकारत आम्ही हे आव्हान पूर्ण केल्याचे गोवेकर पुढे म्हणाले. 

अनुभवी आणि तज्ञ स्कुबा डायमास्टर उतरले समुद्रात..बुडालेले ट्रॉलर्स बाहेर काढण्यासाठी रत्नागिरी येथे गेलेल्या मालवण येथील स्कुबा डायव्हिंग क्षेत्रातील अनुभवी आणि तज्ञ स्कुबा डायव्हर्स नूपुर पराडकर, यतीन मेथर, प्रथमेश आढाव, समिर गोवेकर, सुजित मोंडकर, वैभव खोबरेकर, छगन सावजी यांनी यांसह अन्य खलाशांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRatnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमार