Join us  

पोर्शे कार अपघात प्रकरणावर मुनव्वर फारुकीचं ट्वीट; म्हणाला, "मी १७ वर्षांचा असताना..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 12:08 PM

मुनव्वर फारुकीचं उपहासात्मक ट्वीट

पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. विशाल अग्रवाल या बिल्डरच्या मुलाने दोन जणांना उडवले ज्यात त्यांचा जीव गेला. नंतर तो बिल्डर फरार झाला होता. त्याला शोधून ताब्यात घेण्यात आलं. तर त्याच्या अल्पवयून मुलाची रवानगी रिमांड होममध्ये केली गेली आहे. याप्रकरणी सोशल मीडियावर वातावरण चांगलंच तापलंय. अल्पवयीन मुलावर चांगलीच टीका होत आहे. दरम्यान बिग बॉस 17 चा विजेता मुनव्वर फारुकीने (Munawar Faruqui) काय ट्वीट केलं आहे वाचा.

मुनव्वर फारुकीने ट्वीट करत लिहिले, 'तो पोर्शे कार खरेदी करु शकतो तर त्याने बाकी गोष्टीही विकत घेतल्या असतीलच ना. मी १७ वर्षांचा होतो तेव्हा माझ्याकडे २ रबर बँड लावलेला नोकिया 1100 होता.'

मुनव्वरच्या या ट्वीटवर युझर्सने प्रतिक्रिया देत त्याला सहमती दर्शवली आहे. 'पोर्शे तर घेतली पण माणूसकी विकत घेऊ शकला नाही' अशी कमेंट एका युझरने केली आहे.  तसंच या प्रकरणातील आरोपीला कडक शिक्षा व्हावी असाच सूर सोशल मीडियावर पाहायला मिळतोय. 

मुनव्वर फारूकी बिग बॉस 17 जिंकल्यानंतर चांगलाच चर्चेत आहे. अनेक म्युझिक अल्बम्समध्येही तो दिसला आहे. तसंच आता तो आगामी वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. यामध्ये तो ग्रे शेडेड भूमिकेत आहे.

टॅग्स :पुणे पोर्श अपघातसेलिब्रिटीसोशल मीडिया