Join us  

स्टेडियममध्ये चाहत्यांचा कहर! सेल्फीसाठी जान्हवीच्या दिशेने फेकले मोबाईल, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 11:01 AM

चाहत्यांचं हे वागणं पाहून जान्हवीही झाली शॉक!

अभिनेत्री जान्हवी कपूरची (Janhavi Kapoor) प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. जान्हवीवर तरुण वर्ग तर फिदा असतो. त्यातच तिच्या साडी किंवा वेस्टर्न लूकमधील फोटोंनी ती सर्वांचं लक्ष वेधून घेते. जान्हवीने परवा झालेल्या RCB विरुद्ध RR सामन्यासाठी स्टेडियममध्ये हजेरी लावली. तिच्या आगामी 'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमाच्या प्रमोशनसाठी ती आली होती. यावेळी स्टेडियममध्ये असलेल्या चाहत्यांनी चक्क सेल्फीसाठी तिच्या दिशेने मोबाईलच फेकला. 

गुजरातच्या अहमदाबादमध्ये राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये सामना झाला. यावेळी जान्हवी कपूरने तिचा मित्र ओरीसोबत हजेरी लावली. ती RCB ला पाठिंबा देण्यासाठी आली होती. जान्हवीला पाहून चाहतेही सैराट झाले होते. अनेकांना तिच्यासोबत फोटो हवा होता. मात्र जान्हवी प्रेक्षकांच्या वरच्या फ्लोरवर होती. तिथून ती सर्व चाहत्यांना हात करत होती. त्यातच काही चाहत्यांनी फोटो घेण्यासाठी चक्क स्वत:चे मोबाईलच तिच्या दिशेने फेकले. हे पाहून जान्हवी आणि ओरी दोघंही शॉक झाले. जान्हवी स्वत: त्यांच्या मोबाईलमध्ये सेल्फी घेईल अशी त्यांना आशा होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

चाहत्यांनी मोबाईल फेकल्यानंतर जान्हवी आणि ओरी फोन कॅच करताना दिसले. काही फोन तर खालीही पडले. चाहत्यांच्या या वागण्यावर जान्हवीलाही हसू आलं. ओरीने सगळे मोबाईल एक एक करत पुन्हा खाली फेकले मात्र सेल्फी काही दिला नाही. 

नेटकऱ्यांनी व्हिडिओवर कमेंट करत लिहिले, 'वेडे आहेत सगळे','कोण आहेत हे लोक, कुठून येतात','एका सेल्फीसाठी या लोकांनी मोबाईलचाच त्याग केला'. चाहत्यांच्या अशा वागण्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांची चांगलीच खिल्ली उडवली आहे.

जान्हवी कपूर आगामी 'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमात राजकुमार रावसोबत झळकणार आहे. ३१ मे रोजी सिनेमा रिलीज होतोय. यामध्ये जान्हवीने क्रिकेटपटूची भूमिका साकारली आहे. 

टॅग्स :जान्हवी कपूरबॉलिवूडसोशल मीडिया