Join us  

"तिला पाहिल्यावर डोळ्यात पाणी येतं", मनिषा कोईरालाबरोबरच्या ब्रेकअपनंतर दु:खी झाले होते नाना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 11:46 AM

"ब्रेकअप ही खूप कठीण गोष्ट असते", जेव्हा मनिषाबरोबरच्या नात्यावर बोलले होते नाना पाटेकर

बॉलिवूड अभिनेत्री मनिषा कोईराला हिरामंडी या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेली मनिषा बॉलिवूडमधील करिअरबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होती. अभिनय कारकीर्दीत तिचं नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं होतं. अभिनेता नाना पाटेकर आणि मनिषा कोईरालाचं प्रेमप्रकरण प्रचंड गाजलं होतं. पत्नीपासून वेगळं राहणाऱ्या नानांच्या प्रेमात मनिषा अखंड बुडाली होती. तिला त्यांच्यासोबत लग्नही करायचं होतं. पण, नंतर काही कारणांमुळे त्यांच्यात ब्रेकअप झालं. 

मनिषा कोईराला आणि नाना पाटेकर यांची पहिली भेट 'अग्नीसाक्षी' या सिनेमाच्या सेटवर झाली होती. १९९६ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या सेटवर २० वर्षांनी मोठ्या असलेल्या नानांच्या प्रेमात मनिषा पडली होती. त्यानंतर त्यांनी संजय लीला भन्साळींच्या खामोशी सिनेमातही एकत्र काम केलं होतं. नानांचाही मनिषावर जीव जडला होता. त्यामुळेच ब्रेकअपनंतरही ते तिला विसरू शकले नाहीत. ब्रेकअपनंतर काही वर्षांनी नानांनी मनिषासोबतच्या रिलेशनशिपबाबत भाष्य केलं होतं. 

"मनिषा एक संवेदनशील अभिनेत्री आहे. ती कस्तुरी मृगासारखी आहे. तिच्याकडे सर्वकाही आहे. त्यामुळे तिला कोणाबरोबरही जुळवून घेण्याची गरज नाही, हे तिने समजून घेतलं पाहिजे. ती स्वत:बरोबर काय करत आहे, हे पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी येतं. तिच्याबाबत बोलण्यासाठी माझ्याकडे सध्या काही नाही. ब्रेकअप ही खूप कठीण गोष्ट असते. ते दु:ख जाणून घेण्यासाठी तुम्हाला त्यातून जावं लागतं. ते मी शब्दांत मांडू शकत नाही. आपण याबद्दल न बोललेलच बरं...मी तिला मिस करतो", असं नाना म्हणाले होते. 

नाना पाटेकर आणि मनिषा कोईराला यांचं प्रेमप्रकरण प्रचंड गाजलं होतं. मनिषाने इंटिमेट सीन्स दिलेलही नाना पाटेकरांना आवडत नव्हते. मनिषाला नानांबरोबर लग्न करायचं होतं. पण, पत्नीला घटस्फोट द्यायला ते तयार नसल्याचंही बोललं जात होतं. त्याचदरम्यान मनिषाने नाना पाटेकरांना अभिनेत्री आयशा झुल्कासोबत बंद खोलीत पाहिलं होतं. त्यानंतर अभिनेत्रीने नाना पाटेकरांबरोबर ब्रेक अप केलं. 

टॅग्स :नाना पाटेकरमनिषा कोईरालासिनेमासेलिब्रिटी